Sunday , September 20 2026
Breaking News

गणेशाच्या आगमनानंतर निपाणी बाजारपेठेत गौरी मुखवटे खरेदीसाठी महिलांची गर्दी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : यंदा सर्वत्र गणरायाचे आगमन धामधुमीत पार पडले आहे. आता गणराया पाठोपाठ गौरीचे आगमनदेखील गुरुवारी (ता. १७) घरोघरी होणार आहे. आपल्या घरची गौरी आकर्षक आणि सुंदर दिसावी, याकरता महिला वर्ग गौरीचे मुखवटे, विविध आभूषण आणि साड्यांची खरेदी करीत आहेत.
शहरातील बाजारपेठेत यंदा फायबर, पीओपी, शाडू माती, लाकडी, पितळपासून बनवलेले विविध आकाराचे मुखवटे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शहरातील बाजारपेठेत येणाऱ्या मूर्ती ह्या मुख्यत्वे पेण, पुणे, कोल्हापूरसह ठिकाणावरून आयात केल्या आहेत. मागील दोन ते तीन वर्षांपासून अमरावतीच्या कारागिरांनी बनवलेल्या फायबरच्या सुबक मुखवट्यांना ग्राहकांकडून अधिक मागणी आहे.
यंदा गौरीच्या वस्त्रांमध्ये सहावारी साडी, नऊवारी साडी, मस्तानी नऊवारी, कोळी नऊवारी, ब्राह्मणी नऊवारी, त्रिवेणी नऊवारी अशा विविध प्रकारच्या साड्या बाजारपेठेत उपलब्ध
आहेत. गौरीच्या शृंगारासाठी दागिन्यांची नवलाई बाजारात पाहावयास मिळत आहेत. दागिन्यांमध्ये मोहनमाळ, ठुशी, बोरमाळ, लक्ष्मीहार, चपला हार, मोत्याचे सर, बाजूबंद, कानातील झुबे, वेल, पूर्ण कानवेल, मंगळसूत्र, विविध आकाराच्या नथी, वेण्या आदी पारंपरिक पद्धतीचे दागिने दुकानदारांनी विक्रीसाठी ठेवले आहेत. तर ऑक्सिडाईज रंगाच्या दागिन्यांचीही महिलांमध्ये क्रेज असल्याने गौरीचा श्रृंगारासाठी या दागिन्यांनाही महिला ग्राहकांची पसंत आहे. फायबर, पीओपी, शाडू मातीच्या पूर्णाकृती अखंड मूर्तदिखील बाजारपेठेत विक्रीसाठी आल्या आहेत. यंदा गौराईच्या गालांवर खळी असलेले मुखवटे ग्राहकांचे लक्ष वेधत असून त्यांच्या खरेदीसाठी ग्राहक पसंती देत आहेत. गौरीच्या सजावटीसाठी वापरण्यात येणारे स्टॅन्डची आकारमाना नुसार २०० ते ५०० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गौरी साहित्यांच्या किमतीत १० टक्क्यांची वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *