


बेळगाव : शहरातील चव्हाट गल्ली येथे मध्यरात्री घडलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चौघांचा जिवंत जळून मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. गणेशोत्सवाच्या उत्साहात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने बेळगाव शहर हादरले आहे.
मृतांमध्ये शारदा धमुने (४५) आणि भारती धमुने (५०) प्रिया धमुने (२८) आणि गंगा धमुने (२५) यांचा समावेश आहे तर गजानन धमुने (६५), रोशन धमुने (२१) हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरातील फ्रिजमध्ये स्फोट झाल्यानंतर अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने संपूर्ण घराला वेढले. घरात असलेल्या कुटुंबीयांना बाहेर पडण्याची संधी न मिळाल्याने ही भीषण दुर्घटना घडली.
ही घटना मार्केट पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, घटनेची माहिती मिळताच पोलिस व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta