Sunday , September 20 2026
Breaking News

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी मृणाल हेब्बाळकर यांच्यावर एआयसीसीची महत्त्वाची जबाबदारी

Spread the love

बेळगावच्या युवा नेत्याची काँग्रेस हायकमांडकडून समन्वयकपदी नियुक्ती

नवी दिल्ली : आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (AICC) माध्यम आणि प्रचाराशी संबंधित उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी चार समन्वयकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये बेळगावचे युवा काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांच्यावरही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

AICCच्या माध्यम व प्रचार विभागाचे अध्यक्ष पवन खेरा यांनी सोमवारी (१४ सप्टेंबर) या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा केली. नियुक्त करण्यात आलेले समन्वयक गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीसोबत समन्वय साधून माध्यम, प्रचार आणि पक्षाच्या जनसंपर्काशी संबंधित उपक्रमांची जबाबदारी सांभाळणार आहेत.

नियुक्त करण्यात आलेल्या समन्वयकांमध्ये मॅथ्यू अँथनी – राष्ट्रीय माध्यम समन्वयक, मृणाल हेब्बाळकर – समन्वयक, निशांत आनंद – समन्वयक आणि अली मेहदी – समन्वयक यांचा समावेश आहे.

मृणाल हेब्बाळकर हे काँग्रेसच्या विविध संघटनात्मक जबाबदाऱ्यांमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने त्यांच्यावर सोपविलेली ही जबाबदारी बेळगावच्या युवा नेतृत्वासाठी महत्त्वाची मानली जात आहे. या नियुक्तीमुळे पक्षाच्या माध्यम व प्रचार रणनीतीत त्यांची भूमिका अधिक व्यापक होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *