







निपाणी (वार्ता) : शहराबाहेरील रोहिदासनगर येथील एचपी गॅस गोडावूनच्या मागील बाजूस असलेल्या हालसिद्धनाथ मंदिर परिसरातील श्री संत गजानन महाराज संस्थानतर्फे श्री संत गजानन महाराज यांचा ११७ वा पुण्यतिथी उत्सव मंगळवारी (ता. १५) विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
पुण्यतिथीनिमित्त सकाळी ८ ते ९.३० या वेळेत श्रींचे पारायण होणार असून, त्यानंतर सकाळी १० वाजता महाआरती होईल. तसेच दुपारी १२ ते ३ या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
परिसरातील भाविकांनी या धार्मिक सोहळ्यास उपस्थित राहून श्रींचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार-वडर, शैलजा पाटील-पवार आणि अभिषेक पाटील यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta