







निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कणगला येथील केआयडीसी वळणावर ट्रक उलटून चालक गंभीर जखमी झाला. विक्रम श्रीकांत गीते (वय ३८, रा. बीड) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर संकेश्वर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात ट्रकचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
कणगला के आयडीसी वळणावर कोंबडी खाद्यासाठी मका भरून जाणारे दोन ट्रक आले होते. पुढील ट्रक चालकाने वळण घेण्यासाठी आपला ट्रक काहीसा मागे घेतला. याचवेळी मागून येणाऱ्या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने तो पुढील ट्रकला आदळून रस्त्यावर उलटला. यात चालक गंभीर जखमी झाला. या अपघातात ट्रकचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची नोंद संकेश्वर पोलिसांत झाली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta