बेळगाव : 2 मे रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरुद्ध भाजपचा प्रचार करण्यासाठी येत आहेत, एकनाथ शिंदे सीमासमन्वय मंत्री त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा कधी सीमाभागात मराठी भाषिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आला नाही, युवकांवर खोटे खटले दाखल झाले, तुरुंगात घालण्यात आले, मराठी भाषिकांची विविध प्रकारे गळचेपी झाली, कन्नड सक्ती करून मराठी भाषिकांचे फलक हटविण्यात आले, समितीची आंदोलने चिरडली गेली त्याबाबत कधी ते किंवा त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी दखल घेत नाहीत आणि आता फक्त राजकारण करण्यासाठी जर मुख्यमंत्री साहेब सीमाभागात येणार असतील तर नाईलाजाने महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांचा निषेध नोंदवावा लागेल. तेव्हा सर्व प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री साहेबांनी सीमाभागात येवू नये अशी कळकळीची विनंती महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांनी केली आहे.