Saturday , June 6 2026
Breaking News

देखभाल-दुरुस्तीमुळे रविवारी वडगाव उपकेंद्र परिसरात दिवसभर वीजपुरवठा खंडित

Spread the love

 

‘संडे’ ठरणार ‘ब्लॅक संडे’; सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित

बेळगाव : वीज वाहिन्यांची देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने 110 केव्ही वडगाव उपकेंद्रावरून वीजपुरवठा होणाऱ्या अनेक भागांमध्ये रविवार, 7 जून रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहणार असल्याची माहिती हेस्कॉमने दिली आहे.

यामुळे यरमाळ रोड, बाळकृष्ण नगर, शिवगणेश कॉलनी, गणेश कॉलनी, पाटील गल्ली, चावडी गल्ली, येळ्ळूर रोड, रामदेव गल्ली, सोनार गल्ली, हरी मंदिर परिसर, विष्णू गल्ली, कारभार गल्ली, वजे गल्ली, भारत नगर, देवांग नगर, कलमेश्वर नगर, गुरुदेव गल्ली, तेंगिन गल्ली, रयत गल्ली, बाजार गल्ली, सपार गल्ली, मल्लिकार्जुन मंदिर परिसर, नेकार कॉलनी, निजामिया नगर, मंगाई नगर, मल्लप्रभा नगर, कल्याण नगर, गणेश पेठ, कुलकर्णी कॉलनी, रेणुका नगर, लक्ष्मी गल्ली आदी भागांतील नागरिकांना वीजबंदीचा सामना करावा लागणार आहे.

तसेच महाद्वार रोड, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थ नगर, ओम नगर, टीचर्स कॉलनी, शृंगेरी कॉलनी, जोशी मळा, सुभाष मार्केट, आर.के. मार्ग, हिंदवाडी, आरपीडी रोड, भाग्यनगर, रानडे कॉलनी, सर्वोदय मार्ग, महावीर गार्डन परिसर, आनंदवाडी, अनगोळ-वडगाव मुख्य रस्ता, सह्याद्री कॉलनी, पारिजात कॉलनी, साई श्रद्धा कॉलनी, संत मीरा रोड, वाडा कंपाऊंड, रघुनाथ पेठ, कनकदास कॉलनी, महावीर नगर, आंबेडकर नगर, संभाजीनगर, केशवनगर, येळ्ळूर केएलई, अन्नपूर्णेश्वरी नगर, आनंद नगर, आदर्श नगर, पटवर्धन लेआउट, मेघदूत लेआउट, घुमटमाळ, नाथपै सर्कल आणि जेल शाळा परिसरातील वीजपुरवठाही बंद राहणार आहे.

रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने घरगुती, व्यावसायिक तसेच अन्य कामांवर परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक नियोजन करून सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉमकडून करण्यात आले आहे. तब्बल आठ तासांची वीजबंदी असल्याने अनेकांसाठी यंदाचा रविवार ‘ब्लॅक संडे’ ठरणार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

मराठा बँकेच्या कारभारात भ्रष्टाचार?; कृतीशील मराठा समाज आक्रमक

Spread the love  बेळगाव : मराठा बँकेतील कथित अनियमितता, वाढता खर्च, नियमबाह्य नोकरभरती आणि संचालक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *