Sunday , July 26 2026
Breaking News

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती शैक्षणिक उपक्रम २०२६; इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या पाठविण्याचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : सालाबाद प्रमाणे मातृभाषेतील शाळेत प्रवेश घेऊन मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सीमाभागातील सर्व शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
मागील ९ वर्षे हा उपक्रम सलग सुरू असून २०२६ शैक्षणिक वर्षात सीमाभागातील सर्व मराठी प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या *१लीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या मागवीत आहोत* तरी शाळा मुख्याध्यापक–शिक्षक, पालक, आजी माजी विद्यार्थी किंवा सदर गावातील युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्येची यादी लवकरात लवकर युवा समितीच्या पदाधिकाऱ्याकडे वॉट्सअप द्वारे किंवा प्रत्यक्ष खालील नमूद पत्त्यावर सुपूर्द करावी.

कार्यालयीन पत्ता
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कार्यालय
कावळे संकुल, आर.पी.डी. दुसरा क्रॉस,टिळकवाडी बेळगाव
संपर्क
अंकुश केसरकर (अध्यक्ष) 9739963229
श्रीकांत कदम (सरचिटणीस) 9611756529
प्रतिक पाटील 7338145673
आशिष कोचेरी 9886103373
निखिल देसाई 9902808280
आकाश भेकणे 7204651586

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *