Sunday , July 26 2026
Breaking News

बालवीर विद्यानिकेतन शाळेमध्ये पर्यावरण दिन साजरा

Spread the love

 

बेळगाव : बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी शाळेमध्ये जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रमुख अतिथी सोनिया जाधव यांच्या हस्ते कुंडीतील रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, पर्यावरणाचे महत्त्व अनन्य साधारण असून आपण सर्वांनी त्याचे जतन व संवर्धन केले पाहिजे. भविष्यात पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे कोणतेही काम आपल्या हातून होणार नाही याची काळजी घेऊया. असे पर्यावरणाविषयी मार्गदर्शन करताना त्यांनी आपले विचार मांडले. तसेच श्रीनाथ झगरूचे, वीरा भाटे, अथर्व कुन्नुरकर, तनुष्का गुरव, भार्गवी जाधव, प्राची गावडा या विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयी भाषणे सादर केली. यावेळी कार्यक्रमाला संयोजक शंकर चौगुले, प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापूरकर, माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील अर्बनचे उपाध्यक्ष राजू मुजावर, संचालक दशरथ पाऊसकर, उत्तम चौगुले, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेयस झगरूचे या विद्यार्थ्याने केले तर आभार श्रेयश तुर्केवाडकर या विद्यार्थ्यांने मानले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *