उत्तम पाटील : निपाणीत प्रचारसभा
निपाणी (वार्ता) : महागाईला महिलांसह जनता कंटाळली आहे. त्यामुळे देशभरात परिवर्तनाची लाट आली आहे. चिक्कोडीतही विद्यमान खासदारांच्या विकासकामातील अपयशामुळे काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांचा मताधिक्याने विजय होईल, असा विश्वास सहकाररत्न उत्तम पाटील यांनी व्यक्त केला. शहरातील प्रभाग क्रमांक मधील २१ किणेकर गल्ली येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
उत्तम पाटील यांनी, महिलांसह नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता प्रियांका जारकीहोळी यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी नगरसेवक शेरु बडेघर, माजी नगरसेवक दिलीप पठाडे, माजी नगराध्यक्षा शुभांगी जोशी, निरंजन पाटील-सरकार, राजू नाईकवाडे, दौलत नाईकवाडे, फिरोज पकाली, इर्शाद बागवान, मुदस्सर पिरजादे, मोहिन नाईकवाडे, टिपु काझी, फारुक तुरेवाले, अल्ताफ शानेदिवान यांच्यासह कार्यकर्तेव महिला उपस्थित होत्या.