Sunday , July 26 2026
Breaking News

कणगला येथे भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार, बहिण गंभीर जखमी

Spread the love

 

निपाणी : कणगला परिसरात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची बहीण गंभीर जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आप्पासाहेब लाटकर हे आज सकाळी सुमारे सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या थोरल्या बहिणीला सोडण्यासाठी दुचाकीवरून मोसोबा हिटणीमार्गे कणगलाकडे जात होते. यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या बॉक्साईट वाहतूक करणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत आप्पासाहेब लाटकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या बहिणीच्या दोन्ही पायांवरून ट्रकचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे कणगला, मोसोबा हिटणी व परिसरात शोककळा पसरली असून आप्पासाहेब लाटकर यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *