Sunday , September 20 2026
Breaking News

सायकलच्या चाकाला ‘महागाईचा ब्रेक’; जानेवारीपासून चौथ्यांदा दरवाढ

Spread the love

 

स्पेअरपार्टच्या लहान कंपन्या अडचणीत

निपाणी (वार्ता) : इंधन दरवाढ होण्यासह आरोग्यासाठी सायकल चालविण्याचे महत्त्व आता सर्वांना कळू लागले आहे. त्यापासून वर शहर व परिसरात सायकल खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र सायकलच्या किंमतीत वाढ झाल्याने खिशाला कात्री लागत आहे.
जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत सायकलच्या किमतीत चौथ्यांदा वाढ झाली आहे.
सर्वत्र शाळा सुरू झाल्या असून सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शाखेचे वाटप दरवर्षी होत असते. पण अद्याप यंदा सायकली बाबत कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे सरकारी सह खासगी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‌काही पालक सायकल खरेदी करून देण्याचे अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना आश्वासन दिले आहेत. मात्र ते पूर्ण करताना पालकांची कोंडी होत आहे. सायकलच्या किमती ५०० ते ७५० रुपयांनी वाढल्या आहेत. यापूर्वी २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली होती. या दरवाढीचा सायकल व्यवसायावरही परिणाम दिसत आहे.
सायकलसाठी लागणारे प्लास्टिक, पेट, पेंट तयारकरण्यासाठी लागणारे केमिकल्स, स्पेअर पार्ट्स तयार करण्यासाठी लागणारा कव्या माल, टायर यापैकी बऱ्याचशा वस्तू विदेशातून मागविल्या जातात.अमेरिका-इराणमधील युद्धामुळे कच्च्या मालाच्यादरात वाढ झाल्याने सायकलच्या किमतीही वाढल्या आहे. मजुरी आणि इंधनाचे दर वाढल्याने वाहतुकीचाही खर्च वाढला. त्याचाही परिणाम किमतीवर झाला आहे.
——————————————————————–
स्पेअरपार्ट बनविणाऱ्या कंपन्या अडचणीत
सायकल तयार करणाऱ्या अनेक मोठ्या कंपन्या आपल्या देशात असल्या तरी लुधीयाना येथे खास स्पेअर पार्ट्स तयार करणाऱ्या लहान लहान कंपन्या आहेत. त्या सायकलसाठी लागणारे स्पेअर पार्ट्स तयार करून लहान मोठ्या कंपन्यांना देतात. वेंडरला मिळणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने सायकलच्या किमतीसुद्धा वाढत आहेत. स्पेअर पार्ट्स बनविणाऱ्या कंपन्यांना कच्चा माल अपुरा मिळत असल्याने लहान कंपन्या अडचणीत आल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *