Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणीत इंटरनेट सेवेची गती मंदावल्याने आधार कार्डासह उतारे मिळविण्यासाठी धावपळ

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरातील अनेक ठिकाणी इंटरनेट बंद पडल्या आहेत. याशिवाय ब्रॉडबॅण्ड इंटरनेटची गती मंदावली आहे. इंटरनेट सेवाभावी आधार कार्डसह, शेतीचे उतारे, विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने इंटरनेट सेवा सुरळीत करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.
शहर आणि ग्रामीण भागात ऑप्टिकल फायबरचे जाळे विणले जात असताना शहरवासीयांना गतिमान इंटरनेट सुविधा मिळणे लांबच, परंतु इंटरनेट सेवा सुरळीत मिळणेही आव्हानात्मक आहे. कार्यालयीन, कौटुंबिक पातळीवर इंटरनेटचा वापर वाढत असल्याने शहरभर इंटरनेटचे जाळे पसरलेले आहे. बहुतांश ठिकाणी केबल खंडित झाल्याने मध्यवर्ती शहरासह उपनगरी भागांमध्ये अनेक ठिकाणची इंटरनेट सेवा विस्कळित झाली आहे. अचानक अनेक ठिकाणी उद्भवलेल्या या तांत्रिक बिघाडामुळे अनेकांची गैरसोय होत आहे.
शिवाय शासकीय कार्यालय बँका मधील कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *