Thursday , June 4 2026
Breaking News

दिनेश ओऊळकर यांचा लवकरच नागरी सत्कार

Spread the love

 

बेळगाव : बेळगावचे सुपुत्र व महाराष्ट्र सहकार खात्याचे माजी अतिरिक्त आयुक्त दिनेश ओऊळकर यांची नुकतीच भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) सहकारी बॅंकासाठी आदर्श उपविधी तयार करण्यात येणाऱ्या समितीच्या चेअरमनपदी नियुक्ती केल्याबद्दल त्यांचा लवकरच नागरी सत्कार करण्याचे ठरविण्यात आले.
मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते राजाभाऊ पाटील होते. त्यानी दिनेश ओऊळकर यांच्या सहकार क्षेत्रातील कार्यांचा आढावा घेऊन त्यांची नव्याने झालेली निवड ही बेळगावकराना भूषणावह असल्याचे सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत प्रकाश मरगाळे, शिवराज पाटील, ऍड. एम. जी. पाटील, नेताजी जाधव, शिवाजी हंडे, एन. बी. खांडेकर, रघुनाथ बाडगी, प्रा. विक्रांत पाटील, दत्ता उघाडे, संजीव जोशी, बाळाराम पाटील, शिवाजी सायनेकर, एस. एम. जाधव, प्रकाश अष्टेकर, शिवाजी हंगिरगेकर यांनी भाग घेऊन विविध सूचना मांडल्या. यावेळी रविवार दि 14 रोजी सायंकाळी सायंकाळी साडेचार वाजता मराठा मंदिर येथे व्यापक बैठक घेण्याचे ठरविण्यात आले.
या बैठकीस सहकार क्षेत्रातील विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

युवा समिती सीमाभागच्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा सन्मान

Spread the love  बेळगाव : युवा समिती सीमाभाग च्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नवनिर्वाचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *