Sunday , September 20 2026
Breaking News

जोरदार पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशीही महामार्गावर आलेल्या पाण्यामुळे वाहतूक विस्कळीत

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी शहराजवळ असलेल्या तवंदी घाटात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले होते. जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वहात होते. याशिवाय डोंगरावरून लहान मोठे दगड पाण्यातून आल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. पाण्याचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहनधारकांनी वाहने थांबवून पाऊस कमी होण्याची प्रतीक्षा करत होते. दोन दिवस झालेल्या पावसामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती.
पावसामुळे डोंगर भागातून रस्त्यावर येणारे पाणी आणि पाण्यातून येणारे लहान मोठे दगड यामुळे व वाहनधारकांची तारांबळा उडाली. त्यामुळे नजीकच असलेल्या हॉटेल अमर मधील कर्मचाऱ्यांनीही वाहनधारकांची तारांबळ लक्षात घेऊन भर पावसात रस्त्यावरील दगड बाजूला करून वाहनधारकांना सहकार्य केले. त्यामुळे तब्बल दोन तासानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
परिसरात गेल्या दोन दिवसापासून पावसाचे वातावरण तयार झाले होते. मात्र पावसाने हजेरी लावली नव्हती. बुधवारी आणि गुरुवारी वाळकी याद्यानवाडी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. गुरुवारी तवंदी घाटात पाणी रस्त्यावरून येत असल्याने वाहनधारकांना वाहने सावकाश चालवावी लागत होती. डोंगरातून येणारे लाल मातीचे पाणी आणि त्यातून येणारे लहानमोठ्या दगडामुळे वाहनधारकांना वाहने सावकाश चालवण्याबरोबरच पाण्यापासून लांब घेऊन वाहने रस्ता पार करावी लागत होती. या भागातील सर्वच परिसरात पाण्याचा मोठा लोंढा वाहताना दिसत होता. रस्त्याच्या मोठ्या चारीतून पाणी बाहेर पडून रस्त्यावरून वाहत होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *