Sunday , July 26 2026
Breaking News

राजश्री एग्रीवेंचर, शिवसेनेतर्फे सुळगा (उ.) येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी मुला-मुलींच्या शाळेमध्ये वह्यांचे वाटप

Spread the love

 

बेळगाव तालुक्यातील सुळगा (उ.) येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी मुला-मुलींच्या शाळेमध्ये राजश्री एग्रीवेंचर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बेळगाव यांच्यावतीने मुलां-मुलींना वह्यांचे वाटप करण्याचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.

नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमांतर्गत संपूर्ण 230 मुलां-मुलींना वह्या वाटप करण्यात आले. प्रारंभी प्रमुख पाहुण्या राजश्री अग्रीवेंचरच्या संस्थापिका राजश्री तुडयेकर यांच्या हस्ते श्री सरस्वती पूजन करण्यात आले. कार्यक्रमांमध्ये राजश्री तुडयेकर यांनी उपस्थित विद्यार्थी – विद्यार्थिनींसमोर मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, प्रवीण तेजम, ऍड. प्रशांत पवार, प्रदीप सुतार आदींसह शाळेचे मुख्याध्यापक ओ. एन. मादार, एम. आर. कोवाडकर, व्ही. एन. पावले, शाळेच्या शिक्षक-शिक्षिका आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. एन. मोटरचे यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *