Friday , November 6 2026
Breaking News

इचलकरंजी येथील तरुणाचा मानकापूरमध्ये धारदार शस्त्राने खून

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : मानकापूर येथील नवीन पेट्रोल पंपाच्या मागे तेरदाळे यांच्या शेतात भरदिवसा इचलकरंजी येथील युवकाचा निघृण खून करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मंदार अजित रानडे (वय ३५ वर्षे) असे खून झालेल्या युवकांचे नाव आहे. सदलगा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मंदार रानडे याचा मानकापूर रोडवरील शेतामध्ये वाहनावरून पाठलाग करण्यात आला. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या डोळ्यांत चटणी पूड टाकून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले.
घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बसनगौडा नेर्ली, मंडल पोलीस निरीक्षक विश्वनाथ चौगुला, संजू जमकोळी, शिवानंद पुजारी, गजू हळवर, संतोष गडदे व काडाप्पा मदूर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

About Belgaum Varta

Check Also

राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत निपाणीच्या रतिक लाखेचे दुहेरी यश

Spread the love  निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग) स्पर्धांमध्ये निपाणी येथील‌ रुतिक लाखे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *