खानापूर : विद्यार्थ्यांनी आयुष्यात स्पष्ट ध्येय निश्चित करून सकारात्मक विचार, आत्मविश्वास, शिस्त आणि सातत्याच्या बळावर यश संपादन केले पाहिजे. शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जपल्यास आजची विद्यार्थिनी भविष्यातील एक सक्षम ‘ताराराणी’ म्हणून घडेल, असे प्रबोधनात्मक व प्रेरणादायी उद्गार यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी (ता. चंदगड) येथील प्रसिद्ध अभ्यासक प्रा. डॉ. …
Read More »बहिर्जी शिरोळकर पदवीपूर्व महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, बहिर्जी शिरोळकर पदवी पूर्व महाविद्यालय, हंदिगनूर येथे अकरावीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ नुकताच पार पडला. शाळा व महाविद्यालय सुधारणा कमिटीचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत कुऱ्हाडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव श्री. विक्रम पाटील तर प्रमुख उपस्थिती म्हणून …
Read More »ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी तालुक्यातील सर्व रेशन कार्डधारकांना महत्त्वाचे आवाहन करत ई-केवायसी प्रक्रियेसाठी कोणत्याही रेशन दुकानदाराला एक रुपयाही देऊ नये, असे स्पष्ट केले आहे. सध्या खानापूर तालुक्यातील सर्व शासकीय रेशन दुकानांमध्ये रेशन कार्डधारकांची ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया शासनाकडून पूर्णपणे …
Read More »कर्ले माध्यमिक विद्यालयाला वाॅटर फिल्टरची भेट
बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे, माध्यमिक विद्यालय कर्ले या प्रशाळेला वाॅटर फिल्टर भेट देऊन विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात आले योग प्रशिक्षक गोपाळराव देशपांडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. एम.पी मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविले. अध्यक्ष वाय पी नाईक यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. …
Read More »अतिथी शिक्षकांवरच सरकारी शाळांचा गाडा; राज्यात आणखी ६,६१७ पदांना मंजुरी
बेळगावला १३५ अतिरिक्त अतिथी शिक्षक बेळगाव : राज्यातील सरकारी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने अतिथी शिक्षक नियुक्तीचा दुसरा टप्पा सुरू करत आणखी ६,६१७ पदांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात राज्यभरात मंजूर झालेल्या अतिथी शिक्षकांची संख्या ३६,९४४ वर पोहोचली असून, नियमित शिक्षक भरती होईपर्यंत सरकारी …
Read More »अवघ्या आठ फुटाची गरज राकसकोप जलाशय भरण्यास; संततधार पावसाने पाणीसाठ्यात वाढ
शेतकऱ्यांना दिलासा; हिडकलमध्येही पाण्याची आवक वाढली बेळगाव : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ होत असून, जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता अवघ्या आठ फूट पाण्याचीच आवश्यकता उरली आहे. पावसाचा सध्याचा वेग कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत जलाशय तुडुंब भरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. …
Read More »लेबर कार्डाच्या आमिषाने मजुराला २.६० लाखांचा गंडा
मोबाईल, आधार वारंवार ताब्यात घेऊन बँक खात्यातून रक्कम परस्पर वळवली बेळगाव : लेबर कार्ड बनवून देण्यासह ते अपडेट करून देण्याचे आमिष दाखवत एका मजुराचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर त्याचा मोबाईल फोन व आधार कार्ड वारंवार ताब्यात घेऊन बँक खात्यातून परस्पर तब्बल २ लाख ६० हजार ५८४ रुपये विविध …
Read More »सलामवाडी ग्रामपंचायत हद्दीत दिव्यांग नागरिकांसाठी विशेष
तपासणी व पुनर्वसन शिबिर; 50 लाभार्थ्यांनी घेतला लाभ दड्डी : जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत बेळगाव तसेच महिला व बाल विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (DDRC), बेळगाव यांच्या वतीने सलामवाडी ग्रामपंचायत येथे गुरुवारी दिव्यांग नागरिकांसाठी विशेष वैद्यकीय तपासणी व पुनर्वसन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला दिव्यांग नागरिकांचा …
Read More »प्लॅस्टिक, ताडपत्रीची निपाणी खरेदी-विक्री
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढली : शेतकऱ्यांचीही लगबग सुरू निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील पावसाला प्रारंभ झाला आहे.त्या पार्श्वभूमीवर निपाणी बाजारात प्लॅस्टिक कागद आणि ताडपत्रांची दुकाने सजली आहेत. पाऊस सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यासह मेंढपाळ बांधवाकडून ताडपत्री, प्लॅस्टिक कापड खरेदीसाठी येथील बाजारपेठेमधील दुकानांमध्ये गर्दी होत आहे. महागाई आणि पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे …
Read More »तंजावर साहित्य संमेलनासाठी बेळगावकरांनी सहभागी व्हावे : युवराज संभाजीराजेंचे आवाहन
बेळगावात आयोजकांचे उत्साहात स्वागत; संमेलनात बेळगावकर सहभागी होणार बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने तामिळनाडूतील ऐतिहासिक तंजावर येथे २३ सप्टेंबर २०२६ रोजी राजे सरफोजीराजे भोसले (द्वितीय) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांचे बेळगावातील कॉलेज रोड येथील यश ॲटोच्या दालनात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. दक्षिण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta