बेळगाव – उद्यमबाग येथील कलाश्री उद्योग समूहातर्फे आयोजित ५ व्या कलाश्री लकी ड्रॉ बक्षीस योजनेत कुरबरहट्टी, धामणे गावच्या शिवन्या मनोहर येळ्ळूरकर या ट्रॅक्टरच्या विजेत्या ठरल्या तर भाग्यनगर बेळगावचे प्रसाद चंद्रकांत वंटमुरी हे कारगाडीचे मानकरी ठरले. शगुन गार्डन, उद्यमबाग येथे कलाश्री उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश डोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा …
Read More »सलामवाडीत श्री हनुमान मंदिराचा वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा ४ सप्टेंबरला
दड्डी : सलामवाडी, ता. हुक्केरी येथे ग्रामस्थ, दानशूर व्यक्ती व भक्तांच्या सहकार्याने नव्याने उभारण्यात आलेल्या श्री हनुमान मंदिराचा वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. माजी खासदार मा. श्री. अण्णासाहेब जोल्ले यांच्या निधीतून, तसेच बेळगाव …
Read More »भारतीय सैनिकांसाठी मराठी विद्यानिकेतन शाळेने पाठवल्या रक्षाबंधनानिमित्त राख्या
बेळगाव : देशाच्या सीमेवर ऊन, वारा, पाऊस आणि प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता मातृभूमीच्या रक्षणासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या सैनिक बांधवांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे ‘पहिली राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. शाळेतील बालवाडीपासून दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने सुंदर राख्या तयार केल्या. या राख्यांवर सैनिक बांधवांना समर्पित …
Read More »बेळगाव शहरातील विविध भागांत उद्या वीजपुरवठा खंडित
बेळगाव : हेस्कॉमकडून दुरुस्ती व देखभाल कामे हाती घेण्यात आल्याने बेळगाव शहरातील विविध भागांचा वीजपुरवठा गुरुवार, दि. ३ सप्टेंबर रोजी खंडित करण्यात येणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत संबंधित भागांत वीजपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती हेस्कॉमच्या शहर विभागाने दिली आहे. या कालावधीत आझादनगर, जुने गांधीनगर, दीपक गल्ली, …
Read More »‘बेळगावचा राजा’चा आगमन सोहळा ४ सप्टेंबरला
अनंत चतुर्थीला डॉल्बीमुक्त मिरवणूक; ढोल-ताशांच्या गजरात जपणार पारंपरिक उत्सव बेळगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘बेळगावचा राजा’ गणेशोत्सव मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बेळगाव पोलीस आयुक्तालयात पोलीस प्रशासनासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी गणेशोत्सवातील धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका, वाहतूक व्यवस्था आणि शिस्तीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत ‘बेळगावचा राजा’ गणेशमूर्तीचा भव्य …
Read More »चर्मोद्योग विकास महामंडळाकडून १८ दुकाने मंजूर; गरीब चर्मकार बांधवांना मिळणार रोजगाराची संधी
बेळगाव : चर्मोद्योग विकास महामंडळ (लीडकर) यांच्या माध्यमातून बेळगाव शहर परिसर तसेच उत्तर विभागातील गरीब व गरजू चर्मकार बांधवांसाठी सुसज्ज अशा १८ खोकी (दुकाने) मंजूर करण्यात आली असून, लवकरच त्यांचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात येणार आहे. याप्रसंगी लीडकरचे बेळगाव जिल्हा संयोजक ए. आर. रुद्रेशी यांनी लाभार्थ्यांना व्यवसायासंदर्भात मार्गदर्शन केले. या …
Read More »हमी योजनेच्या पाठपुराव्याला यश; चोर्ला गावासाठी बससेवा सुरू
खानापूर : तालुक्यातील पंचहमी योजनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर मंगळवारी (ता.१) रोजी चोर्ला गावासाठी बससेवा सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांसह महिला आणि कामगार वर्गाच्या सोयीसाठी सकाळच्या वेळेत बस सुरू करावी, अशी मागणी गॅरंटी योजनेच्या सदस्य प्रियांका गावकर यांनी योजनेच्या पहिल्या बैठकीपासून सातत्याने केली होती. त्यांच्या मागणीला अखेर यश आले. पंच हमी …
Read More »रिमझिम सरींत रंगली मंगळागौर; तीन पिढ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
वेदांत सखीचा मंगळागौर सोहळा उत्साहात; पारंपरिक खेळ, झिम्मा-फुगडी अन् स्नेहभोजनाने वातावरणात रंगत बेळगाव : पावसाच्या रिमझिम सरींनी प्रसन्न झालेल्या वातावरणात पारंपरिक मंगळागौरीच्या उत्साहाला उधाण आले. ‘मंगळागौर खेळून सांगड घालूया सखी… सर्वजणी’ या भावनेतून वेदांत सखीच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही मंगळागौर उत्साहात साजरी करण्यात आली. यंदाचे हे अकरावे वर्ष होते. वेदांत …
Read More »तीन महिन्यांत रेशन कार्ड रद्द करण्यावर ब्रेक!
बीपीएल-एपीएल कार्डधारकांना मोठा दिलासा; निकषांच्या फेरविचारानंतरच पुढील निर्णय : मंत्री रिजवान हर्षद बेळगाव : राज्यातील बीपीएल आणि एपीएल रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. पुढील तीन महिन्यांत एकही रेशन कार्ड रद्द केले जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. सध्याच्या परिस्थितीत रेशन कार्ड रद्द करण्याची प्रक्रिया थांबविण्यात …
Read More »खडेबाजार पोलिस ठाण्याच्या आवारात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
प्रेमप्रकरणातून प्रकार घडल्याची चर्चा; जखमी तरुणावर सिव्हिलमध्ये उपचार बेळगाव : खडेबाजार पोलिस ठाण्याच्या आवारातच एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने मंगळवारी सायंकाळी खळबळ उडाली. या घटनेत जखमी झालेल्या तरुणाला पोलिसांनी तातडीने सिव्हिल रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हिंडलगा परिसरातील हा तरुण मंगळवारी सायंकाळी खडेबाजार पोलिस …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta