Friday , October 23 2026
Breaking News

‘वार्ता’ मधील बातमीचा इम्पॅक्ट : नादुरुस्त जलवाहिनीच्या कामाला प्रारंभ

Spread the love

 

नगरपालिका आयुक्तांनी घेतली दखल

निपाणी (वार्ता) : अनेक दिवसापासून शहरास उपनगरात नादुरुस्त जलवाहिनीतून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात होते. परिणामी नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. शिवाय पाणी गेल्यानंतर पुन्हा जलवाहिनीमध्ये गढूळ पाणी जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता. याबाबत बेळगाव ‘वार्ता’ मधून सचित्र वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. नगरपालिका आयुक्तासह पाणीपुरवठा विभागाने त्याची गांभीर्याने दखल घेऊन बेळगाव नाक्यावरी जलवाहिनीच्या दुरुस्तीला प्रारंभ केला आहे त्यामुळे परिसरातील नागरिकातून समान व्यक्त होत आहे.

यंदा म्हणावा तसा पाऊस न पडल्याने जवाहर तलाव ओव्हर फ्लो झालेला नाही. अशातच तलावात पाणीपुरवठा करणारी वेदगंगा नदी कोरडी ठाक पडली आहे. परिणामी यमगर्णी नदीवर जॅकवेलचा पाणीपुरवठा थांबला आहे. त्यामुळे अनेक प्रभागात सहा ते सात दिवसातून एकदा अपुरा पाणीपुरवठा होत आहे. याबाबतची सविस्तर माहिती ‘वार्ता’ने दिली होती.
नगरपालिका आयुक्त गणपती पाटील आणि पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेत सोमवारी बेळगाव नाक्यावरील लागलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीला प्रारंभ केला आहे. त्यामुळे या पुढील काळात परिसरातील नागरिकांना पुरेशीय पाणी मिळेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
——————————————————————–
अनेक ठिकाणी गळत्या सुरूच
शहर आणि उपनगरात अवजड वाहतकीमुळे अनेक ठिकाणच्या जलवाहिन्या निकाम्या झाल्या आहेत. त्यामुळे पाणी सोडल्यानंतर बहुतांश पाणी रस्त्याच्या गटारीत जात आहे. अशा ठिकाणच्या जलवाहिन्यांची माहिती घेऊन त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
——————————————————————-
‘सध्या नगरपालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे शहराची शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी त्यांच्यावर असून बेळगाव नाक्याप्रमाणे इथे ठिकाणीही लक्ष देऊन जलवाहिन्यांच्या गळत्या काढून नागरिकांना योग्य प्रमाणात पाणीपुरवठा करावा.’
-ॲड. संजय चव्हाण, माजी शासन नियुक्त नगरसेवक, निपाणी.

About Belgaum Varta

Check Also

‘एसआयआर’ प्रक्रिया रद्द करण्यासाठी काँग्रेसतर्फे ज्ञानेश कुमार यांच्या पुतळ्याचे दहन

Spread the love  निपाणी (वार्ता) : ‘एसआयआर’ प्रक्रिया तत्काळ रद्द करावी, शिवाय चुकीच्या पद्धतीने वगळण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *