Friday , October 23 2026
Breaking News

वातावरणातील बदलामुळे निपाणी भागातील शेतकऱ्यांचा आंतरपीकाकडे कल वाढतोय

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : यंदाच्या वातावरणातील बदलामुळे शहर आणि ग्रामीण भागातील अनेक शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देत आंतरपीक घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून चांगले उत्पन्न मिळत असल्याने बेनाडी येथील प्रगतशील शेतकरी रावसाहेब जनवाडे यांनी एक एकर क्षेत्रामध्ये झेंडू फुलांची लागवड केली असून त्यामध्ये मिरचीचे पीक घेतले आहे. ही दोन्ही पिके तरारून आली आहेत.

रावसाहेब जनवाडे यांनी शेतीची मशागत करून सऱ्या सोडल्या सरीवर झेंडूच्या रोपाची लागण केली. त्यानंतर ठिबक सिंचनची जोडणी करून त्यामध्ये मिरचीचे तरु लावले आहेत. सध्या फुलांना बहर आला असून मिरची पीकही चांगले आले आहेत. सध्या घाऊक बाजारात झेंडू फुलांना २५ रुपये तर हिरव्या मिरच्यांना ३० रुपये प्रति किलो दर मिळत आहे. त्यामुळे कमी क्षेत्रात जादा पीक त्यांना मिळणार आहे.
अनेक अल्पभूधारक शेतकरी एकच एक पीक पद्धतीवर अवलंबून आहेत. अशा पद्धतीमुळे उत्पन्नावर मर्यादा येतात. बाजारपेठेतील दरांमध्ये घसरण झाल्यास तोटा सहन करावा लागतो. एकच पीक पद्धतीमुळे जमिनीचे आरोग्य, कसही कमी होतो. मातीतूनक्ष संसर्गित रोग-किडींची समस्या वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकामध्ये फेरपालट करण्याचे आवाहन जनवाडे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

ममदापूरमध्ये विजयादशमी निमित्त सीमोल्लंघन

Spread the love  निपाणी (वार्ता) : नवरात्र उत्सवाचा अखेरच्या दिवशी ममदापूर (के.एल.) विजया दशमी पारंपरिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *