Friday , November 6 2026
Breaking News

Belgaum Varta

विद्याभारती राष्ट्रीय मुलींच्या फुटबॉल स्पर्धा उद्यापासून

  बेळगाव : विद्याभारती कर्नाटक व दक्षिण मध्यक्षेत्र पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हा व संत मीरा इंग्रजी माध्यमिक स्कूल अनगोळ, आयोजित 37व्या विद्याभारती राष्ट्रीय मुलींच्या फुटबॉल स्पर्धेला गुरुवार तारीख 8 पासून प्रारंभ होणार आहे. प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील विद्याभारती फुटबॉल स्पर्धा आयोजन करण्याचा मान अनगोळच्या संत मीरा शाळेला प्राप्त झाला आहे यंदा …

Read More »

खानापूर तालुका पंचायतमध्ये पाच गॅरंटी योजनांचा आढावा

  खानापूर : तालुका पंचायत खानापूर येथे आज पाच गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी गॅरंटी योजना समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी होते. बैठकीस तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी रमेश मैत्री तसेच गॅरंटी योजना समितीचे सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये पाचही गॅरंटी योजनांच्या प्रगतीचा …

Read More »

मध्यवर्ती सार्वजनिक दसरा महोत्सव महामंडळाच्या उपाध्यक्षपदी संदीप कामुले यांची निवड

  बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून बेळगावकरांच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा मान राखत मध्यवर्ती सार्वजनिक दसरा महोत्सव महामंडळाच्या माध्यमातून दसरा महोत्सव अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. महामंडळाचे मानद अध्यक्ष श्री. रमाकांत दादा कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली दसरा महोत्सवाचे आयोजन सातत्याने उत्कृष्ट पद्धतीने केले जात आहे. महामंडळाच्या …

Read More »

सुगीच्या हंगामात वासुदेवाचे आगमन; शहरासह ग्रामीण भागात जुन्या आठवणींना उजाळा

  निपाणी (वार्ता) : सध्या सर्वत्र विविध पिकांचा सुगीचा हंगाम सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर शहर आणि ग्रामीण भागात वासुदेवाची पारंपारिक वेशभूषा करून सुगी मागण्यासाठी वासुदेव समाजातील नागरिक परिसरात दाखल झाले आहे. लातूर जिल्ह्यातील एकनाथ पांडुरंग शिंदे (दाळंबी) यांनी वासुदेवाची पारंपरिक वेशभूषा धारण करून गावोगावी पुरून जुन्या आठवणींना उजाळा देत …

Read More »

शिवानंद महाविद्यालयात गुरुवारी विशेष व्याख्यान व बक्षीस वितरण

    निबंध-वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा होणार गौरव; डॉ. चंद्रकांत पोतदार यांचे विशेष व्याख्यान कागवाड : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव आणि शिवानंद महाविद्यालय, कागवाडच्या मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. ८) सकाळी ११ वाजता महाविद्यालयात विशेष व्याख्यान आणि निबंध-वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण …

Read More »

भाग्यनगर परिसरातून १० मेंढ्यांची चोरी; तिघे ताब्यात

  स्विफ्ट कारसह ३.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त; टिळकवाडी पोलिसांची कारवाई बेळगाव : भाग्यनगर परिसरातून तब्बल १० मेंढ्यांची चोरी केल्याप्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत चोरीसाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट कार आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. भाग्यनगर परिसरातून १० …

Read More »

शेतात काम करत असताना मधमाशांचा हल्ला; शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

  बेळगाव : शेतात काम करत असताना शेतकऱ्यावर मधमाशांनी अचानक हल्ला केल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथील भडांगे कॉलनी परिसरात बुधवारी सकाळी घडली. अजित वासुदेव पाटील (वय ६१) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पाटील हे सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास शेतातील पिकांना …

Read More »

चाऱ्याच्या शोधात महाराष्ट्रातील मेंढ्यांचे कळप कर्नाटक सीमाभागकडे स्थलांतरित

  निपाणी (वार्ता) : यंदा अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेळ्या-मेंढ्यांना चरण्यासाठी चारा उपलब्ध होत नसल्याने मेंढपाळांसमोर संकट निर्माण झाले आहे. दुष्काळी भागातील पाण्याचे स्रोतही कोरडे पडू लागले आहेत. परिणामी तुटपुंज्या चाऱ्याच्या शोधात महाराष्ट्रातील मेंढपाळांची पावले कर्नाटक सीमाभागाकडे वळू लागली आहेत. महाराष्ट्रातील अनेक भागात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण …

Read More »

पत्नीला भेटायला आलेल्या तरुणावर पतीचा रॉडने हल्ला

  दोघांच्या डोक्यात, हातावर वार; ‘आज सोडत नाही, खल्लास करतो’ म्हणत जीवे मारण्याचा प्रयत्न बेळगाव : पत्नीला भेटण्यासाठी घरी आलेल्या तरुणासह पत्नीवर पतीने लोखंडी रॉडने हल्ला करून दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (५) रात्री सुमारास हुंचेनहट्टी येथे घडली. या हल्ल्यात शिल्पा उदय बडीगेर (वय ३२) आणि बसवराज पराप्पा …

Read More »

पुण्याच्या MPSC आंदोलनात घुमला सीमालढ्याचा जयघोष

  “बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे”च्या घोषणेने सीमावासीयांचे लक्ष वेधले पुणे : पुणे येथे एस. एम. जोशी पुलाशेजारी MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, या आंदोलनाला महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावहून पुण्यात जाऊन प्रत्यक्ष भेट देत पाठिंबा दिला. या वेळी कोल्हापूरचा MPSC विद्यार्थी …

Read More »