बेळगाव : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, जिल्ह्यातील मतदार यादीच्या विशेष व्यापक सुधारणेची प्रक्रिया पूर्ण झाली असून, सोमवारी मतदार यादीचा मसुदा अधिकृतपणे प्रकाशित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. मतदार यादीच्या विशेष व्यापक सुधारणेसंदर्भात आणि मतदार यादीच्या मसुद्यासंदर्भात सोमवारी (२४ ऑगस्ट) जिल्हाधिकारी कार्यालयात …
Read More »एपीएमसी पोलिसांकडून घरफोडीच्या तीन गुन्ह्यांचा छडा; ६.११ लाखांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त
बेळगाव : एपीएमसी पोलिसांनी घरफोडीच्या प्रकरणाचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून ५ लाख ८९ हजार ३८० रुपये किमतीचे ४१.४३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २२ हजार १४६ रुपये किमतीचे ९३.४५ ग्रॅम चांदीचे दागिने, असा एकूण ६ लाख ११ हजार ५२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ४ …
Read More »सलामवाडी येथे भावेश्वरी देवीचा महाभिषेक सोहळा उद्या
दड्डी : सलामवाडी, ता. हुक्केरी येथील ग्रामदैवत श्री भावेश्वरी देवीचा महाभिषेक सोहळा उद्या, मंगळवार दि. २५ ऑगस्ट रोजी धार्मिक व भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाभिषेक सोहळ्यानिमित्त सकाळपासून देवीची विशेष पूजा-अर्चा, …
Read More »महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे मच्छे शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण
मच्छे : दरवर्षीप्रमाणे मच्छे येथील सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळेतील एलकेजी, युकेजी आणि इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना तसेच लक्ष्मीनगर, मच्छे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष गजानन छप्रे होते. यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे कार्याध्यक्ष श्री. सचिन …
Read More »बेळ्ळारी नाल्याच्या पूरस्थितीमुळे पीक नुकसानीवर वडगावात शेतकऱ्यांची बुधवारी बैठक
बेळगाव : बेळ्ळारी नाल्याला येणाऱ्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वडगाव येथे शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. वडगाव, जुने बेळगाव, शहापूर आणि अनगोळ परिसरातील शेतकऱ्यांसाठी ही बैठक बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता श्री ज्ञानेश्वर मंदिर, राजवाडा कंपाउंड, वडगाव येथे होणार …
Read More »हातमाग कामगाराच्या आत्महत्येनंतर कुटुंबाला २५ लाखांची मदत आणि कर्जमाफीची मागणी
बेळगाव : हातमाग कारखान्यात काम करणारे विठ्ठल लोकरी यांनी कर्जाच्या बोजामुळे १६ ऑगस्ट २०२६ रोजी आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कुटुंबाला शासनाने तातडीने २५ लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, तसेच कुटुंबावरील सुमारे ६ लाख रुपयांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी कूली नेकार कामगार संघटनेने केली आहे. याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी …
Read More »महिला PSI च्या अश्लील व्हिडिओला हिंडलगा कारागृहाचे नाव जोडल्याचा आरोप; कारवाईसाठी न्यायालयात धाव
बेळगाव : महिला पोलीस उपनिरीक्षकाशी (PSI) संबंधित अश्लील व्हिडिओ प्रकरणाला आता हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाचे नाव जोडले गेल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. कारागृहाची बदनामी करणारी माहिती सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप करत हिंडलगा केंद्रीय कारागृहाच्या सहाय्यक अधीक्षकांनी बेळगावच्या द्वितीय जेएमएफसी न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या संध्या …
Read More »खानापूर तालुक्यातील समस्यांवर आमदार-खासदार मौनावस्थेत? रस्त्यांच्या दुरवस्थेवर नागरिकांत नाराजी
खानापूर : तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, आता रस्त्यांवरील खड्ड्यांवरून चक्क गाणी तयार होऊ लागली आहेत. गावोगावी या समस्येची चर्चा सुरू असतानाही लोकप्रतिनिधी मात्र मौन बाळगून असल्याची टीका नागरिकांतून होत आहे. तालुक्यातील अनेक प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी तर रस्ता आहे की खड्डे, …
Read More »मालकी नसतानाही जमीन हडपण्याचा डाव; बनावट जीपीएप्रकरणी महिला अटकेत
करंबळच्या एक एकर जमिनीचा परस्पर व्यवहार करण्याचा प्रयत्न; दोघे पोलिसांच्या रडारवर बेळगाव : जमीन व्यवहारातील फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस गंभीर होत असताना, आपणच जमिनीचे मूळ मालक असल्याचे भासवून बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन विक्रीचा डाव रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खानापूर तालुक्यातील करंबळ येथील तब्बल एक एकर कृषी जमिनीचा परस्पर …
Read More »श्री तुकाराम को- ऑपरेटीव्ह बँकेची 75 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
बेळगाव : श्री तुकाराम को- ऑपरेटीव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 23/08/2026 रोजी बँकेच्या श्रीमान अर्जुनराव मेघोजीराव दळवी सभागृहात बँकेचे चेअरमन श्री. प्रकाश आ. मरगाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बँकेचे मॅनेजर श्री. संकोच कुंदगोळकर यांनी बँकेच्या वतीने उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत केले. व अहवाल साली बँकेच्या मयत झालेल्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta