राज्याध्यक्षांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणी जाहीर बेळगाव : कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघ (र) बेंगळूर, बेळगाव जिल्हा घटक कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून संघाचे राज्याध्यक्ष संदीप बुधियाळ जी यांच्या उपस्थितीत नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. शिक्षक संघाच्या जिल्हा अध्यक्षपदी कणकुंबी हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. जी. चिगुळकर तर कार्यदर्शीपदी बेळगाव बेनस्मित …
Read More »बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
बेळगांव : बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (२९ सप्टेंबर) उत्साहात पार पडली. अध्यक्ष कृष्णा शहापूरकर अध्यक्षस्थानी होते. कार्यकारिणी सदस्य शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक केल्यावर प्रारंभी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, पत्रकार संघाचे सदस्य प्रकाश काकडे यांच्या पत्नी तुळसा व सदस्या मनिषा सुभेदार यांच्या …
Read More »दिवेआगर समुद्रात आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
आळंदीतील खासगी क्लासेसच्या सहलीवर काळाचा घाला; समुद्राच्या खोलीचा अंदाज चुकला रायगड (नरेश पाटील) : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी (१ ऑक्टोबर) घडलेल्या भीषण दुर्घटनेत पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. पर्यटनासाठी दिवेआगर येथे आलेल्या विद्यार्थ्यांनी समुद्रात प्रवेश केला असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तसेच समुद्राच्या …
Read More »एसआयआर प्रकरणात भाजप नेते रवी पाटील यांच्यासह २५ जणांवर गुन्हा
१९८ मतदारांची नावे हटविण्यासाठी बनावट अर्ज केल्याचा आरोप; बेळगावच्या मार्केट पोलिसांत एफआयआर बेळगाव : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या (SIR) प्रक्रियेत अल्पसंख्याक समाजातील १९८ मतदारांची नावे यादीतून वगळण्यासाठी बनावट कागदपत्रे व खोटी माहितीच्या आधारे फॉर्म क्रमांक ७ सादर करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून भाजप नेते डॉ. रवी पाटील यांच्यासह २० …
Read More »नियंत्रण सुटून दुचाकी डिव्हायडरला धडकली; १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
बेळगाव : दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी गांधीनगर परिसरातील राष्ट्रीय महामार्गाजवळ घडली. ध्रुव कर्जगी (१९, रा. महांतेशनगर, बेळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या डिव्हायडरवर जोरात आदळली. या अपघातात ध्रुव याचा घटनास्थळीच …
Read More »मुलांच्या नकारात्मक गोष्टींचा बाऊ न करता सकारात्मकतेची वाट दाखवा
प्रा. डॉ. संजीवनी खंडागळे; रणझुंझार को-ऑप. क्रेडिट सोसायटीची वार्षिक सभा व गुणवंत पाल्यांचा गुणगौरव निलजी : मुलांच्या नकारात्मक गोष्टींचा बाऊ न करता त्यांच्या बुद्धीला सकारात्मकतेची वाट दाखविली, तरच ते भविष्यात उत्तम नागरिक घडतील. पालकांनी मुलांशी अधिकाधिक संवाद साधून त्यांच्या आवडीनिवडी, अडचणी आणि भावना जाणून घ्याव्यात. संवादातून कुटुंबातील जिव्हाळा व …
Read More »वृंदावन कॉलनीतील मैदानावर शेडला नागरिकांचा विरोध : रमाकांत कोंडुस्कर यांची महापालिका आयुक्तांकडे तक्रार
दोन दिवसांत शेड हटविण्याची मागणी बेळगाव : भाग्यनगर (५वा क्रॉस) येथील वृंदावन कॉलनीतील लहान मुलांसाठी राखीव असलेल्या खेळाच्या मैदानावर उभारण्यात येत असलेल्या शेडला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून नागरिकांनी महानगरपालिकेकडे या बांधकामाबाबत तक्रारी करून मैदानावर कोणतेही शेड अथवा धार्मिक स्वरूपाचे बांधकाम करू नये, अशी मागणी …
Read More »खेळामुळे शरीर तंदुरुस्त बनू शकते; आमदार शशिकला जोल्ले
निपाणीत तालुका पातळीवरील क्रीडा, प्रज्ञाशोध स्पर्धेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील मुले नेहमी व्यायाम करत असल्याने ते शारीरिक दृष्ट्या सदृढ बनत आहेत. याशिवाय शाळेतील विविध खेळामुळे शरीर तंदुरुस्त बनत आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती असून युवकांनी व्यसनापासून दूर राहून आरोग्य जपावे. विद्यार्थ्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध स्पर्धा भरविण्यासह खेळाबाबत …
Read More »कंत्राटदारांच्या ३८ हजार कोटींच्या थकीत बिलांवरून शेट्टरांचा हल्लाबोल
डी.के. शिवकुमारांनी असंवेदनशील वक्तव्ये थांबवावीत; मठाधीशांवरील वक्तव्याबद्दल माफी मागण्याची मागणी बेळगाव : राज्यातील काँग्रेस सरकारच्या कारभारावर तसेच उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या कार्यपद्धतीवर खासदार जगदीश शेट्टर यांनी बेळगावात जोरदार टीका केली. कंत्राटदारांच्या संघटनेने राज्यात सुमारे ₹३८ हजार कोटींची बिले थकीत असल्याचा दावा केला आहे. मात्र, या प्रश्नावर डी.के. शिवकुमार यांच्याकडून …
Read More »बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो.चा स्केटर देवेन बामणे आणि साईराज मेंडके यांची जागतिक स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर्स देवेन बामणे आणि साईराज मेंडके यांची दक्षिण अमेरिकेतील पॅराग्वे सिटी येथे होणाऱ्या जागतिक स्केटिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. देवेन हा के.एल.एस. जी.आय.टी. इंजिनिअरिंग कॉलेजचा, तर साईराज हा आर.एल.एस. कॉलेजचा विद्यार्थी आहे. भारतीय संघाच्या निवड चाचण्या भुवनेश्वर (ओडिशा) आणि मोहाली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta