Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

नवीन बंधारा निर्मितीसह जुन्या बांधाराच्या दुरुस्तीसाठी बोरगावमध्ये शेतकऱ्यांची बैठक

  निपाणी (वार्ता) : बोरगाव-घोसरवाड दरम्यान असलेल्या दूधगंगा नदीवर कायमस्वरूपी बंधाऱ्याची निर्मिती करण्यासह जुन्या बंधाऱ्याची दुरुस्ती करून बोरगाव परिसरातील पिण्याच्या आणि शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी बैठकीत केली. उन्हाळ्यात दूधगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्यासह शेती पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. तात्यासाहेब बसन्नावर म्हणाले, बोरगावच्या …

Read More »

नागपंचमीनिमित्त मुचंडी मळ्यात श्री नागदेवता मंदिरात धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद

  बेळगाव : महात्मा फुले रोड, मुचंडी मळा येथील श्री नागदेवता मंदिरात नागपंचमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपंचमी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त २९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता लघुरुद्राभिषेक, तर सकाळी ९ वाजता सुदर्शन होम आयोजित करण्यात आला आहे. तसेच सांप्रदायिक भजनाचा …

Read More »

श्री वरद सिद्धिविनायक मंदिरात विविध कार्यक्रम

  बेळगाव : भक्तांच्या नवसाला पावणारा व सर्व भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा असे नाव लौकिक प्राप्त झालेल्या श्री महालक्ष्मी व श्री सरस्वती सहित असणारे द्विभुज स्वयंभू श्री वरद सिद्धी विनायक मंदिर, (मार्कंडेयनगर ए.पी.एम.सी समोर) येथे नवग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना मंगळवार दि. 25/8/2026 रोजी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी मंदिरात दिनांक 20/8/26 पासून …

Read More »

बेळगावमध्ये तालुक्यातील विविध शाळांमध्ये युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

  बेळगाव : मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच मराठी शाळेतील पटसंख्या वाढावी आणि मराठी शाळा टिकवून ठेवाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत तुरमुरी, बाची, कोनेवाडी, बसुर्ते, बेक्किनकेरे, उचगाव, …

Read More »

‘बेळगाव कर्नाटकाचा अविभाज्य भाग’ ठरावावरून महापालिका सभेत गोंधळ

  बेळगाव : बेळगाव हे कर्नाटकाचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट करणारा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतच मंजूर करावा, अशी मागणी काँग्रेस आणि सरकारच्या नामनिर्देशित सदस्यांनी मंगळवारी लावून धरली. या मुद्द्यावरून महापालिका सभेत काही काळ जोरदार गदारोळ झाला. सभा सुरू होताच काँग्रेस सदस्यांनी कर्नाटकाच्या बाजूने ठराव स्वीकारण्याची मागणी केली. सरकारच्या सूचनेची वाट …

Read More »

लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासाठी सतीश जारकीहोळी यांची बॅटिंग

  बेळगाव : राज्य मंत्रिमंडळातील रिक्त असलेल्या महिला कोट्यातील एका मंत्रीपदावरून पुन्हा राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि उमाश्री यांच्या नावांची चर्चा सुरू असतानाच मंत्री सतीश जारकीहोळी यांनी हेब्बाळकर यांच्या बाजूने भूमिका मांडल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे. मंत्रिमंडळ पुनर्रचनेदरम्यान महिलांना अपेक्षित प्रतिनिधित्व मिळाले …

Read More »

गळतगा स्मशानभूमी हिरवीगार करण्यासह बुद्धविहारात शांततेसोबत पक्ष्यांचा अधिवास

  निपाणी (वार्ता) : भूमी वात्सल्य फाऊंडेशनतर्फे गळतगा येथील स्मशानभूमी परिसरात ५१ देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. स्मशानभूमी परिसर हरित व पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला तक्षशिला बुद्ध विहार सेवा संघ गळतगा यांचे सहकार्य लाभले. भूमी वात्सल्य फाऊंडेशनचे संस्थापक पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक प्रबोधनाचा संदेश …

Read More »

कुपवाड हल्ल्यातील जखमी मोहन केसरेकर यांचाही मृत्यू

  खानापूर : सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे 15 ऑगस्ट रोजी खानापूर तालुक्यातील केसरेकर दाम्पत्यावर झालेल्या हल्ल्याची धक्कादायक परिणती झाली आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनीषा केसरेकर यांचा घटनादिवशीच मृत्यू झाला होता. त्यानंतर आयसीयूमध्ये उपचार सुरू असलेले त्यांचे पती मोहन केसरेकर यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे केसरेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर …

Read More »

मन्नूर येथील मातोश्री सोसायटीतर्फे नवनिर्वाचित शाळा सुधारणा समितीचा सत्कार

  बेळगाव : मन्नूर येथील मातोश्री सोहार्द सहकारी संघ (सोसायटी) यांच्या वतीने नवनिर्वाचित शाळा सुधारणा समितीच्या पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. मातोश्री सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आर. एम. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात नवनिर्वाचित शाळा सुधारणा समितीच्या पदाधिकारी व सदस्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार …

Read More »

अत्याधुनिक नंबर प्लेट, हेल्मेट सक्तीबाबत निपाणी पोलिसांची धडक कारवाई; दिवसभरात ३९ जणावर कारवाईचा बडगा

  निपाणी (वार्ता) : श्रावण सोमवारची संधी साधून शहरासह ग्रामीण भागातील नागरिक बाजार आणि इतर कामानिमित्त आले असताना अचानकच निपाणी शहर, बसवेश्वर पोलीस ठाण्यातर्फे उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ यांनी अत्याधुनिक नंबर प्लेट, अल्पवयीन दुचाकीस्वार, विना हेल्मेट दुचाकी स्वारावर येथील साखरवाडी परिसरात दिवसभर कारवाईची मोहीम उघडली. यावेळी पोलिसांनी दंडात्मक कारवाई स्वीकारा अन्यथा …

Read More »