प्रादेशिक आयुक्तांची कठोर भूमिका; आयुक्तांकडून तीन दिवसांत वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविला सत्ताधारी-विरोधकांच्या संघर्षाची प्रशासकीय पातळीवर दखल; अहवालानंतर राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेतील सत्तासंघर्ष आता केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांपुरता मर्यादित राहिलेला नसून, त्याची धग थेट प्रशासकीय पातळीपर्यंत पोहोचली आहे. महानगरपालिका बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्याच्या मागणीवर प्रादेशिक आयुक्त कार्यालयाने …
Read More »माजी मंत्री बी. सी. नागेश यांचे निधन; ६७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
तुमकूर : माजी शिक्षणमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी. सी. नागेश (६७) यांचे मंगळवारी बंगळुरू येथील त्यांच्या मुलीच्या निवासस्थानी आजारपणामुळे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बी. सी. नागेश हे व्यवसायाने बी.ई. इंजिनिअर होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा दीर्घकाळ संबंध होता. तिपटूर …
Read More »केपीएससी अध्यक्ष शिवशंकरप्पांना हायकोर्टाचा दिलासा; राज्यपालांचा निलंबन आदेश रद्द
बंगळूर : मुलीला सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी पदाचा गैरवापर आणि घराणेशाही केल्याच्या आरोपावरून कर्नाटक लोकसेवा आयोगाचे (केपीएससी) अध्यक्ष शिवशंकरप्पा साहुकार यांना निलंबित करण्याचा राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केला. तसेच, आदेशाची प्रत मिळाल्यानंतर सात दिवसांत शिवशंकरप्पा यांची केपीएससी अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. …
Read More »अनगोळमधील घरफोडीचा छडा; दोघांना अटक, २.४९ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त
बेळगाव : अनगोळ येथील शिवशक्तीनगर परिसरात झालेल्या घरफोडीच्या प्रकरणाचा छडा लावण्यात टिळकवाडी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे २ लाख ४९ हजार २६० रुपये किमतीचे १७.८३ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. टिळकवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनगोळ, शिवशक्तीनगर येथे चोरी झाल्याप्रकरणी …
Read More »१९५ मराठी शिक्षक पदांवर कुऱ्हाड; खानापूर म. ए. समितीचा सरकारला इशारा!
रिक्त पदांचा तातडीने समावेश करण्याची मागणी बेळगाव : कर्नाटक शासनाने राज्यातील १५ हजार शिक्षक पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली असताना मराठी माध्यमाच्या शाळांतील रिक्त पदांना मात्र केराची टोपली दाखविण्यात आल्याचा आरोप होत आहे. बेळगाव विभागासाठी यापूर्वी ८३१ शिक्षक पदे मंजूर करण्यात आली होती. मात्र, १२ ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या …
Read More »निपाणी मराठा मंडळमध्ये नागपंचमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मराठा मंडळ संचलित बालवाडी, मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा व निपाणी मराठा मंडळ हायस्कूल, निपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने नागपंचमीचा सण पश साजरा करण्यात आला. नागपंचमीच्या निमित्ताने शाळेच्या परिसरात नागदेवतेचे पूजन करण्यात आले. यावेळी पालक सुबोध कुलकर्णी, रोहित कदम मनीषा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत नागदेवतेच्या प्रतिमेचे …
Read More »गुड्स शेड रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन
बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दक्षिण प्रवेशद्वाराला जोडणाऱ्या प्रमुख गुड्स शेड रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून, या रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसह दोन्ही बाजूंना गटार व्यवस्था उभारण्यात यावी, अशी मागणी खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे करण्यात आली आहे. शहापूर तसेच दक्षिण बेळगाव परिसरातील हजारो नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांसाठी हा …
Read More »स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधींचा चुराडा; खड्डेमय रस्ते, बंद गाळे अन् निकृष्ट कामांचा पाढा : रमाकांत कोंडुसकरांचा लोकप्रतिनिधींवर घणाघाती हल्ला
बेळगाव : विकासाच्या नावाखाली बेळगावकरांची दिशाभूल आणि फसवणूक सुरू आहे. कोट्यवधींचा निधी खर्चूनही शहराची अवस्था सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस विद्रूप होत चालली आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराचा स्मार्टपणा कमी आणि विद्रूपपणा अधिक वाढला आहे. जनतेच्या पैशातून होणाऱ्या कामांचे श्रेय घेणाऱ्या लोकप्रतिनिधींनी प्रथम जनतेला दर्जेदार सुविधा देण्याची जबाबदारी पार पाडावी, असा घणाघाती …
Read More »समाज हिताच्या प्रश्नासाठी समाज सारथी संघ राहणार अग्रेसर
मृत्यू नोंदणीतील अडथळे, शिवाजी रोडवरील विद्युत तारा दुरुस्ती, येळ्ळूर रस्त्यावरील कचऱ्याच्या समस्येबाबत चर्चा येळ्ळूर : नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित विविध समस्या सोडविण्यासाठी समाज सारथी संघ सक्रिय झाला आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी, शिवाजी रोडवरील खाली आलेल्या विद्युत तारांमुळे निर्माण झालेला धोका तसेच येळ्ळूर रस्त्यावर केएलई रुग्णालयालगत टाकण्यात …
Read More »पार्वतीनगर, शाहूनगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीती
बेळगाव : कंग्राळी खुर्द येथील पार्वतीनगर व शाहूनगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, वयोवृद्ध नागरिक, लहान मुले तसेच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांवर कुत्र्यांकडून अचानक हल्ले केले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. परिसरातील रस्त्यांवर मोठ्या संख्येने भटक्या कुत्र्यांचा वावर असून, दुचाकीस्वार तसेच पायी जाणाऱ्या नागरिकांच्या मागे धावण्याचे प्रकारही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta