Saturday , October 3 2026
Breaking News

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

Spread the love

 

विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन

मुतगे : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल, मुतगे (ता. बेळगाव) येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी व्यसनमुक्त कार्यक्रम राबविण्यात आला.
शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष सुनील अष्टेकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. मुलींच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मराठी विषयाचे शिक्षक शिवाजी हसनेकर यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. शाळा सुधारणा समितीचे सदस्य नारायणराव कणबरकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एस. जाधव व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक एस. आर. तिरविर यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सी.पी.आय. आय. आर. पडूणशेट्टी यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच डॉ. सतीश चोळीगर यांच्या हस्ते लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक आय. आर. पडूणशेट्टी म्हणाले, “कोणतेही व्यसन हे वाईटच असते. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून आपला वेळ अभ्यास आणि व्यायामासाठी दिला पाहिजे. व्यसनाधीन झाल्यास विद्यार्थ्यांचे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होऊ शकते.”
डॉ. सतीश चोळीगर यांनी महात्मा गांधीजींच्या जीवनातील मूल्यांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा, असे सांगितले. “महात्मा गांधीजी लहानपणापासूनच प्रामाणिक होते. विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या जीवनातून चांगले गुण घेऊन आपले जीवन सार्थकी लावावे,” असे त्यांनी नमूद केले.
यावेळी शाळा सुधारणा समितीचे सदस्य शिरीष पाटील, श्रीनिवास पाटील, माजी मुख्याध्यापक पी. वाय. पाटील, माजी मुख्याध्यापक एम. वाय. केदार, प्रभारी मुख्याध्यापिका एम. बी. लगाडे, बी. व्ही. गुडगेनहट्टी, ए. एस. पाटील, एस. आर. पाटील यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम केराडे यांनी केले, तर व्ही. व्ही. खामकर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘सप्तस्वर’चा चार्टर स्थापना सोहळा उत्साहात

Spread the love  बेळगाव : इंटरनॅशनल फेलोशिप ऑफ रोटेरियन म्युझिशियन्स (IFRM)च्या बेळगाव अध्याय ‘सप्तस्वर’चा चार्टर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *