Friday , October 2 2026
Breaking News

स्वरतरंग सांगीतिक कार्यक्रम ४ ऑक्टोबर रोजी

Spread the love

 

 

बेळगांव : मराठी भाषाप्रेमी मंडळ बेळगांव व बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली यांच्या वतीने रविवार दि. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता स्वरतरंग हा बासरी वादन व गायनाचा सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात निवृत्त प्राध्यापक दत्ता नाडगौडा व नचिकेत सुहास गुर्जर यांचे बासरी वादन, श्रीमती पद्मा नाडगौडा यांचे हार्मोनियम गायन , कुमारी वैष्णवी नाडगौडा यांचे‌ भावगीत गायन व वैभव गाडगीळ यांचे तबलावादन होणार आहे. विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटीने हा कार्यक्रम प्रायोजित केला आहे.
तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन, (रेल्वे ओव्हर ब्रीजजवळ) खानापूर रोड, बेळगांव येथे हा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘सप्तस्वर’चा चार्टर स्थापना सोहळा उत्साहात

Spread the love  बेळगाव : इंटरनॅशनल फेलोशिप ऑफ रोटेरियन म्युझिशियन्स (IFRM)च्या बेळगाव अध्याय ‘सप्तस्वर’चा चार्टर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *