Friday , October 2 2026
Breaking News

लायन्स क्लब ऑफ बेळगाव टिळकवाडीतर्फे १८० स्वच्छता कर्मचाऱ्यांचे लसीकरण

Spread the love

 

 

बेळगाव : लायन्स क्लब ऑफ बेळगाव टिळकवाडीच्या वतीने क्लबच्या कायमस्वरूपी उपक्रमांतर्गत महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त बेळगाव महापालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. कचेरी गल्ली, शहापूर येथील आरोग्य निरीक्षक कार्यालयात झालेल्या या शिबिरात एकूण १८० स्वच्छता कर्मचाऱ्यांना लसीकरणाचा लाभ देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष राजू भातकांडे, नगरसेवक गिरीश धोंगडी व जयंत जाधव, तसेच लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. राजेंद्र कागवाड यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी स्वच्छता निरीक्षक श्याम चौगुले यांनी स्वागत केले. राजेंद्र कागवाड यांनी लायन्स क्लब ऑफ बेळगाव टिळकवाडीच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम गेल्या १६ वर्षांपासून कोणताही खंड न पडता सातत्याने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी शेख होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमास ला. प्रकाश मूरकीभावी, ला. मल्हारी दिवटे, ला. प्रथमेश टपाले, ला. मधुकर मोटर, ला. अरविंद संगोळी आणि ला. अरविंद कलघटगी यांच्यासह क्लबचे सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘सप्तस्वर’चा चार्टर स्थापना सोहळा उत्साहात

Spread the love  बेळगाव : इंटरनॅशनल फेलोशिप ऑफ रोटेरियन म्युझिशियन्स (IFRM)च्या बेळगाव अध्याय ‘सप्तस्वर’चा चार्टर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *