


बेळगाव : भाग्यनगर स्थित आदर्श गुणविकास प्रतिष्ठान संचलित मुक्तांगण विद्यालय या इंग्रजी माध्यम शाळेत आज महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती संयुक्तपणे साजरी करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या असेंबली नंतर सानवी सनदी या विद्यार्थिनीने स्वागत केले
त्यानंतर दीप प्रज्वलन व महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सामूहिकपणे “रघुपति राघव राजाराम” ही प्रार्थना सादर करण्यात आली.
शाळेच्या मुख्याध्यापिका सविता जेके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातील सत्य, अहिंसा, स्वच्छता, यासारख्या गुणांचा व तत्वांचा अंगीकार करून विद्यार्थ्यांनी आपले जीवन यशस्वी करावे असे आवाहन त्यांनी केले. अनेक विद्यार्थ्यांनी या दोन महान पुरुषांच्या बद्दल आपली भाषणे केली कुमारी खुशी माडकर हिने आभार प्रदर्शन केले. खातूबी सनदी या शिक्षिकेने या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Belgaum Varta Belgaum Varta