Friday , October 2 2026
Breaking News

मच्छे मराठी मॉडेल शाळेत गांधी जयंती, शास्त्री जयंती व डिजिटल बोर्ड उद्घाटन सोहळा उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : मच्छे येथील सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळेत महात्मा गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंती तसेच शाळेला नव्याने प्राप्त झालेल्या 65 इंची डिजिटल स्मार्ट बोर्डचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अभिषेक अलॉय प्रा. लि. चे मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री. एम. एन. आचार्य सर उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते डिजिटल स्मार्ट बोर्डचे उद्घाटन करण्यात आले. तसेच महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी एसडीएमसी व शाळेच्या वतीने श्री. आचार्य सरांचा पुस्तक, रोपटे, पुष्पहार व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

जरी काही कारणामुळे आचार्य साहेबांचे सुपुत्र श्री. मयूर माधव आचार्य आणि सून सौ. मनविता मयूर आचार्य या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत, तरी या संपूर्ण आचार्य कुटुंबाच्या सहकार्यातूनच शाळेला सुमारे 1 लाख 30 हजार रुपये किमतीचा डिजिटल स्मार्ट बोर्ड देणगी स्वरूपात प्राप्त झाला आहे. त्याबद्दल संपूर्ण आचार्य कुटुंबाचे शाळेच्या वतीने मनापासून आभार मानण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना श्री. आचार्य सर यांनी अत्यंत नम्रपणे आपले विचार मांडले. CSR निधीच्या माध्यमातून समाजासाठी योगदान देण्याची कंपनीची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी विद्यार्थ्यांना “भविष्यात मोठे होण्याबरोबरच मोठे दाते व्हा आणि समाजाची बांधिलकी कायम जपा. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, ही भावना नेहमी मनात ठेवा,” असा मोलाचा संदेश दिला. तसेच त्यांनी शेतकऱ्यांच्या कष्टांचे उदाहरण देत मेहनत व जबाबदारीचे महत्त्व पटवून दिले.

शाळेला मिळालेल्या डिजिटल स्मार्ट बोर्डमुळे विद्यार्थ्यांना अधिक आधुनिक, चित्रमय व परिणामकारक पद्धतीने शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस डी एम सी अध्यक्ष श्री. गजानन छप्रे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चोपडे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शेरलेकर मॅडम यांनी केले.

यावेळी एस डी एम सी सदस्य परशुराम कोलेकर, प्रशांत नांदोडकर, अमोल लाड, महेश लाड, अनिल करडी, अमित बाळेकुंद्री, सौ. रूपा कनबरकर, सौ. रुक्मिणी लाड, चेतन सायानक, नागेश शानभाग, विनायक शानभाग तसेच इतर सदस्य, शिक्षकवृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात पार पडला.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूरच्या के.पी.एस. मराठी मॉडेल शाळेत गांधी-शास्त्री जयंती उत्साहात

Spread the love  येळ्ळूर : येथील के.पी.एस. मराठी मॉडेल शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *