Friday , October 2 2026
Breaking News

येळ्ळूरच्या के.पी.एस. मराठी मॉडेल शाळेत गांधी-शास्त्री जयंती उत्साहात

Spread the love

 

येळ्ळूर : येथील के.पी.एस. मराठी मॉडेल शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

शाळेच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.डी.एम.सी. अध्यक्षा सौ. दिव्या संदीप कुंडकेकर होत्या. यावेळी भारतीय सैनिक कु. धिरज बजरंग घाडी, सीआरपीएफच्या कु. श्रद्धा सुभाष धुळजी, एस.डी.एम.सी. उपाध्यक्ष श्री. जोतिबा यल्लाप्पा उडकेकर, सदस्य श्री. चांगदेव शिवाजी मुरकुटे, श्री. मारुती कृष्णा यळगुकर, सदस्या सौ. प्रियंका राणोजी सांबरेकर तसेच शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री. राजेंद्र चलवादी उपस्थित होते.

मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर कु. श्रद्धा सुभाष धुळजी यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे, तर कु. धिरज बजरंग घाडी यांच्या हस्ते लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी ‘जय जवान, जय किसान’ या लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचा संदर्भ देत शाळेतील माजी विद्यार्थी आणि भारतीय सैनिक कु. धिरज बजरंग घाडी तसेच सीआरपीएफच्या कु. श्रद्धा सुभाष धुळजी यांचा शाळेच्या वतीने शाल, पुष्पहार आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे केली. तसेच संगीत सादरीकरणातून कार्यक्रमाची रंगत वाढवली.

सन २०२६-२७ च्या पहिल्या सत्रातील शैक्षणिक व क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा एस.डी.एम.सी. सदस्य श्री. चांगदेव शिवाजी मुरकुटे यांच्या हस्ते वह्या देऊन गौरव करण्यात आला. तसेच जयंतीनिमित्त भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना एस.डी.एम.सी. सदस्य श्री. मारुती कृष्णा यळगुकर यांनी आपल्या आजी कै. गंगुबाई लुमाण्णा यळगुकर यांच्या स्मरणार्थ वह्या देऊन प्रोत्साहन दिले.

कु. श्रद्धा सुभाष धुळजी यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले. कु. धिरज बजरंग घाडी यांनी विद्यार्थी घडविताना आवश्यक असलेल्या गुणांवर मार्गदर्शन केले.

एस.डी.एम.सी. उपाध्यक्ष श्री. जोतिबा यल्लाप्पा उडकेकर यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात सौ. दिव्या संदीप कुंडकेकर यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत बक्षिसे देणाऱ्या एस.डी.एम.सी. सदस्यांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ. मेघा देसाई यांनी केले. स्वागत सहशिक्षिका सौ. ऐश्वर्या मेणसे यांनी केले, तर आभार शिक्षक श्री. सातेरी पाखरे यांनी मानले.

कार्यक्रमास एस.डी.एम.सी. अध्यक्षा, उपाध्यक्ष, सदस्य, वरिष्ठ मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मच्छे मराठी मॉडेल शाळेत गांधी जयंती, शास्त्री जयंती व डिजिटल बोर्ड उद्घाटन सोहळा उत्साहात

Spread the love  बेळगाव : मच्छे येथील सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळेत महात्मा गांधी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *