


निपाणी (वार्ता) : महिलांनी चुल आणि मुल यामध्ये गुरुफटून न राहता स्वाभिमान व अधिकारासाठी संघटित होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात महिलांनी संघटित होऊन आदर्श महिला संघटना निर्माण केल्याचा अभिमान असल्याचे निपाणी तालुका पंचहमी अनुष्ठान योजना कमिटी अध्यक्ष रमेश जाधव यांनी सांगितले. मांगुर येथे आयोजित आदर्श महिला मंडळाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती महिला सदस्य सीमा पाटील म्हणाल्या, महिलांनी निर्माण केलेला इतिहास सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून समाजात कार्यरत राहण्याचे आवाहन केले. मंडळाच्या अध्यक्षा वैशाली भोसले, स्वप्निल जळणे, शुभांगी बिरनाळे, मीनल राजहंस, अंजू मुल्ला. सिकंदर मधाळे, संगीता मधाळे, रोहित जाधव, वाशिम नदाफ, अनिल आडके यांनीही मनोगत व्यक्त केले.
कामिनी थरकार यांनी स्वागत केले. ॲड. आम्रपाली भोसले यांनी सूत्रसंचालन तर अस्मिता भोसले यांनी आभार मानले. यावेळी शबाना नायकवडी, दिव्या कोळी, संगीता कोळी, विनोद बोधले, कमल कोळी विमल तराळ, अश्विनी कोळी, ज्योती देशमाने, शोभा खोत, मालन वाघे, वैशाली कांबळे, नूरजहाॅ चोरघस्ते यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

Belgaum Varta Belgaum Varta