Friday , October 2 2026
Breaking News

तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत ए. एस. पाटील हायस्कूलचे उल्लेखनीय यश

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : श्री बाहुबली विद्यापीठ, संचलित निपाणी स्तवनिधी मधील ए. एस. पाटील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी निपाणी तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत शाळेतील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. यामध्ये आदिती पाटील हिने द्वितीय क्रमांक, पार्थ माने याने द्वितीय क्रमांक मिळवला.
जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले. अमृता केसरकर हिने प्रथम क्रमांक पटकविल्याने तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पार्थ पमाने यानेही प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली.
या यशाबद्दल श्री बाहुबली विद्यापीठ संचालीत स्तवनीधी
पार्श्वनाथ गुरुकुल आश्रमचे संचालक महावीर पाटील, मुख्याध्यापक एस. एस. तेरदाळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यातर्फे यशस्वी यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी तालुका व्हॉलीबॉल स्पर्धेत कुर्ली सिद्धेश्वर हायस्कूलचे वर्चस्व

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे १७ वर्षाखालील निपाणी तालुका पातळीवरील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *