


निपाणी (वार्ता) : निपाणी येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे १७ वर्षाखालील निपाणी तालुका पातळीवरील व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथिल सिद्धेश्वर विद्यालयाच्या मुलांच्या व्हॉलीबॉल संघाने प्रथम क्रमांक मिळवित आपले वर्चस्व कायम ठेवले. त्यांची सलग चौदाव्या वर्षी जिल्हा स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली आहे.
बेडकीहाळ येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये निपाणी तालुक्यातील विविध विभागा मधून नामवंत संघांनी सहभाग घेतला होता. कुर्ली व्हॉलीबॉल संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत स्तवनिधी संघाचा एकतर्फी पराभव करीत विजेतेपद पटकाविले. निपाणी क्रीडाशिक्षणाधिकारी सुनील पडलिहाळे यांचे हस्ते पारितोषिक देवून संघातील खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. या संघात चैतन्य पोवार, सार्थक कमते, प्रेमकुमार कांबळे, सार्थक वड्डर, समर्थ कमते, पवन माळी, सार्थक आडाव, प्रकाश दिवटे, कार्तिक पोवार, सुदर्शन पाटील यांचा सहभाग होता. विजयी संघातील खेळाडूना क्रीडा शिक्षक ए. ए. चौगुले, सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लबचे रोहित पाटील, यशवंत ढगे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांना मुख्याध्यापक एस.एस. चौगुले यांच्यासह शिक्षक, स्कूल कमिटी व बेटरमेन्ट कमिटी सदस्य, पालकांचे प्रोत्साहन मिळाले. विजयी संघाचे परिसरातून कौतुक होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta