


निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील विद्यासागर शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तालुका पातळीवरील विविध क्रीडा प्रकारात यश मिळवले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्यानिमित्त शिक्षण संस्थातर्फे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब हावले व संचालक मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
गोकाक येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत विद्यासागर शिक्षण संस्थेतील प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची ज्युडो,योगा व कबड्डी साठी राज्यस्तरीय निवड झाली आहे. प्राथमिक विभागातून ज्युडो स्पर्धेत आदर्श परीट, योगा स्पर्धेत संजना हावले, श्रेया पाटील, सार्थक चौगुले, विनायक माळगे, यांची निवड झाली आहे. माध्यमिक विभागातून मनीषा माळगे, पौर्णिमा कुदुरे प्राप्ती चौगुले, साक्षी बंकापुरे, अमर माळगे, सम्मेद सवाडे, ओमकार नेजे यांची तर कुस्ती स्पर्धेत भक्ती चौगुले, साक्षी बंकापुरे यांची निवड झाली आहे.
संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब हावले यांनी,जिद्द, चिकाटी आणि सरावाच्या जोरावर विद्यासागर शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करून राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड होण्याचा मान मिळविला आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवल्याचे सांगितले.
कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष विद्याधर अम्मानावर, संचालक अनुज हावले, रावसाहेब तेरदाळे, शिवाप्पा माळगे, भाऊसाहेब पाटील, सीईओ ऐश्वर्या हवले, मुख्याध्यापक राजू खिचडे, श्रीकांत कोळी, क्रीडा शिक्षक प्रशांत पाटील, सुमित्रा गुंजाळ, निकिता पाटील, अजित हावले, नेमिनाथ बारवाडे, आनंद फिरगनवर उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta