Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

बेळगाव तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसंदर्भात तालुका म. ए. समितीच्या वतीने उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करणार

  बेळगाव : पावसामुळे बेळगाव तालुक्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या संपर्क रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, किरकोळ अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, या मागणीसाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण …

Read More »

हिडकल जलाशयाची सुरक्षा रामभरोसे!

  २० हून अधिक कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; मुख्य प्रवेशद्वाराची दुरवस्था, प्रवेश नियंत्रणही कुचकामी बेळगाव : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या जलाशयांपैकी एक असलेल्या हिडकल जलाशयाची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असल्याचे चित्र समोर आले आहे. जलाशयाच्या सुरक्षेसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेले २० हून अधिक सुरक्षारक्षक कर्तव्य बजावताना हलगर्जीपणा करीत असल्याचा …

Read More »

नागेंद्रांवर बोट, मग दक्षिण आमदारांवर मौन का?

  अभय पाटील यांच्या राजीनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्याग्रह; भाजपच्या भ्रष्टाचारविरोधी भूमिकेला थेट आव्हान बेळगाव : भ्रष्टाचाराविरोधात भाजपने उभारलेल्या आंदोलनाला आता बेळगावातच प्रतिआव्हान मिळाले आहे. काँग्रेसचे मंत्री बी. नागेंद्र यांच्या कथित भ्रष्टाचारावरून भाजपकडून राजीनाम्याची मागणी करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अहोरात्र आंदोलन सुरू असतानाच, बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्याविरोधातील कथित भ्रष्टाचार व …

Read More »

केसरेकर दांपत्य खून प्रकरण: आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत श्रीराम सेना हिंदुस्थान आणि मराठा समाज लढणार

  २१ ऑगस्ट रोजी बेळगावात भव्य मूक मोर्चा बेळगाव : सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे खानपूर तालुक्यातील हेब्बाळ गावच्या मोहन नागप्पा केसरेकर आणि त्यांच्या पत्नी निशा मोहन केसरेकर यांची झालेली अमानुष हत्या अत्यंत निंदनीय आहे. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर, श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख श्री. रमाकांत कोंडूस्कर यांनी हेब्बाळ गावातील पीडित कुटुंबीयांची …

Read More »

भाषेच्या भिंती ओलांडून कुगजी दाम्पत्याचा मदतीचा हात; कन्नड साहित्यिकांच्या पत्नीच्या हृदयशस्त्रक्रियेसाठी 25 हजारांची मदत

  येळ्ळूर : जात, धर्म आणि भाषेच्या भिंती बाजूला ठेवून गरजूंच्या मदतीला धावून जाणाऱ्या हणमंत कुगजी आणि त्यांच्या पत्नी उज्वला कुगजी यांनी जमखंडी येथील कन्नड साहित्यिक देशपांडे यांच्या पत्नीच्या हृदयशस्त्रक्रियेसाठी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत करून माणुसकीचा आदर्श निर्माण केला आहे. जमखंडी येथील साहित्यिक देशपांडे यांच्या पत्नी वैभवी व्ही. देशपांडे …

Read More »

कुपवाड हल्ला प्रकरण : उद्या खानापुरात म. ए. समितीची तातडीची बैठक

  खानापूर : कुपवाड (सांगली) येथे गत १५ ऑगस्ट २०२६ रोजी खानापूर तालुक्यातील केसरेकर दांपत्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरला होता. या थरारक घटनेत गंभीर जखमी झालेल्या मनीषा केसरेकर यांचा त्याच दिवशी दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर त्यांचे पती मोहन केसरेकर यांच्यावर गंभीर अवस्थेत अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू …

Read More »

नवतरंग कार्निव्हल 2026 : ‘भारताची सांस्कृतिक विविधता’ रॅम्प वॉकमधून साकार

  बेळगाव : भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवत के.एल.एस. गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स, बेळगावीच्या बी.कॉम. विभागातील हॉबी क्लबतर्फे वेदांत फाउंडेशन, बेळगाव यांच्या सहकार्याने ‘नवतरंग कार्निव्हल 2026 – रॅम्प वॉक स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले. ‘भारताची सांस्कृतिक विविधता’ या विषयावर 14 ऑगस्ट रोजी के.के. वेणुगोपाल ऑडिटोरियम, प्लॅटिनम ज्युबिली बिल्डिंग येथे ही …

Read More »

केसरेकर दांपत्य हत्याकांड: आरोपीला फाशीच्या मागणीसाठी २१ ऑगस्टला बेळगावात भव्य मूक मोर्चा

  पोलीस आयुक्तांना निवेदन बेळगाव : सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे झालेल्या बेळगाव जिल्ह्यातील मराठी दांपत्याच्या निर्घृण हत्येचा निषेध करण्यासाठी आणि आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बेळगावात येत्या शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० वाजता एका भव्य मूक मोर्चाचे (शांतता रॅली) आयोजन करण्यात आले आहे. बेळगावचा मराठी समुदाय आणि मराठा …

Read More »

राज्य रँकिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूंची चमकदार कामगिरी; ९ पदकांची कमाई

बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्सनी बंगळुरू आणि तुमकूर येथे झालेल्या राज्यस्तरीय खुल्या रँकिंग स्केटिंग स्पर्धा २०२६ मध्ये दमदार कामगिरी करत बेळगावचे नाव उज्ज्वल केले. या स्पर्धेत राज्यभरातील २०० हून अधिक अव्वल स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता. बेळगावच्या स्केटर्सनी उत्कृष्ट कामगिरी करत ७ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्य …

Read More »

तंजावर साहित्य संमेलनासाठी नियोजन बैठकीचे आवाहन

  अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव व शिवसंदेश भारत बेळगाव : तामिळनाडूतील ऐतिहासिक तंजावर येथे दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी राजे सरफोजीराजे भोसले (द्वितीय) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलनासाठी बेळगावातून मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या संमेलनाच्या अनुषंगाने तंजावर येथे जाण्याचे नियोजन, …

Read More »