Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

बेळगाव शहरातून सराईत आरोपीची हद्दपारी; सहा गुन्ह्यांची नोंद

  बेळगाव : शहरातील सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या सराईत आरोपीवर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. सुरेश मुनिस्वामी जालगार (वय ४१, रा. कपिलेश्वर मंदिरामागे, जालगार गल्ली, बेळगाव) याला बेळगाव शहरातून हद्दपार करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सुरेश जालगार हा सन २००५ पासून मारामारी, लुटमार, जुगार, …

Read More »

शारदा विद्यालयात मोफत नेत्रतपासणी शिबिर

    बेळगाव : शहापूर येथील शारदा विद्यालय इंग्रजी माध्यम शाळेत बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी एम. एम. जोशी कोडकणी आय केअर सेंटरच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराच्या प्रारंभी मुख्याध्यापिका सौ. स्वाती घोडेकर यांनी नेत्रतज्ञांचे स्वागत केले. यावेळी यशवंत जोशी यांनी विद्यार्थ्यांना डोळ्यांचे आरोग्य, डोळ्यांची योग्य …

Read More »

पार्श्वमतीमती विद्यालयात समंतभद्र महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विज्ञान प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा

  निपाणी (वार्ता) : श्री बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित श्री पार्श्वमती विद्यालय अक्कोळ येथे संस्थेचे संस्थापक गुरुदेव १०८ श्री समंतभद्र महाराज यांच्या ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त विज्ञान प्रदर्शन व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष राजू पाटील, कार्यकारी संचालक महावीर पाटील, अनिता पाटील, दादासाहेब मगदूम, अशोक होनशेट्टी, संमती …

Read More »

युवक हे समाजपरिवर्तनाचे सक्रिय शिल्पकार : ऑनररी कॅप्टन लक्ष्मण पाटील

  कुर्ली येथे युवासंमेलन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : युवक हे देशाचे भविष्य आणि समाजाच्या प्रगतीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. युवकांमध्ये ऊर्जा, उत्साह, कल्पकता, नेतृत्वगुण आणि नवनवीन विचार करण्याची क्षमता असते.सक्षम युवक, सक्षम समाज, सक्षम राष्ट्र या विचाराने युवकांनी सामाजिक कार्यात पुढाकार घेतल्यास समाजाचा सर्वांगीण विकास साधता येईल. त्यामुळे युवक हे केवळ …

Read More »

चनम्मा नगर, उद्यमबाग परिसरात खुलेआम गांजाची विक्री; उचगावच्या तरुणाला बेड्या

  १ किलो २१२ ग्रॅम गांजासह मोटारसायकल, मोबाईल जप्त; १.०३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत बेळगाव : चनम्मा नगर, डबल रोड, उद्यमबाग परिसरात खुलेआम गांजाची विक्री करणाऱ्या उचगाव येथील तरुणाच्या मुसक्या आवळण्यात उद्यमबाग पोलिसांना यश आले. पोलिसांनी सापळा रचून गांजा विक्री करताना सागर सुरेश मोरे (वय २९, रा. उचगाव) याला रंगेहाथ अटक …

Read More »

रेशनधारकांना दिलासा! ई-केवायसीला तात्पुरती स्थगिती

  सर्व्हरवरील ताणामुळे निर्णय; १ सप्टेंबरपासून प्रक्रिया पुन्हा सुरू बेळगाव : रेशन कार्डधारकांच्या सदस्यांची दर पाच वर्षांनी करण्यात येणारी ई-केवायसी प्रक्रिया सध्या तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कोट्यातून ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे धान्य एकाचवेळी वितरित केले जात असल्याने लाभार्थ्यांना दोन वेळा बायोमेट्रिक प्रमाणीकरण करावे लागत आहे. …

Read More »

गणेशोत्सवापूर्वी ग्रामीण रस्ते दुरुस्त करा; तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी

  बेळगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था, गणेशोत्सव मंडळांना सुविधा आणि तात्पुरत्या वीज जोडणीसंदर्भातील विविध मागण्यांसाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. गणेशोत्सवापूर्वी ग्रामीण बेळगाव तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून आवश्यक डागडुजी करावी, अशी प्रमुख मागणी समितीने केली. तालुक्यातील …

Read More »

महिला पोलिस अधिकाऱ्याचा अर्धनग्न व्हिडिओ व्हायरल; दोघांविरुद्ध तक्रार, कब्बन पार्क पोलिसांकडून एनसीआर दाखल

  बेंगळुरू : कारागृहातील कैद्यांसोबत महिला पोलिस अधिकाऱ्याने अर्धनग्न अवस्थेत व्हिडिओ कॉल केल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने काही दिवसांपासून खळबळ उडाली होती. या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, संबंधित महिला पोलिस अधिकाऱ्याने व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोघांविरुद्ध बेंगळुरूतील कब्बन पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिला अधिकाऱ्याने …

Read More »

बालमनातील कवितेतून संस्कार आणि समाजप्रबोधन घडावे : निळूभाऊ नार्वेकर

  बेळगाव येथे दुसरे बालकवी संमेलन उत्साहात; ५७ बालकवींनी सादर केल्या कविता बेळगाव : बालमनातील कविता प्रत्येकाच्या मनाला भावणारी आणि गोड वाटणारी असते. कवितेतील भावार्थ, रचनेमागील अंतर्मन आणि शब्दांचा अर्थ यांना विशेष महत्त्व असते. केवळ शब्दांची जुळवाजुळव करून कविता रचल्याने तिच्यात साहित्यिक मूल्य निर्माण होत नाही. रचनात्मक कविता समाजाला प्रेरणा, …

Read More »

गणेशोत्सवापूर्वी गटार स्वच्छता, पथदीप दुरुस्ती व विकासकामे तातडीने सुरू करण्याची मागणी

  चापगाव (ता. खानापूर) : आगामी गणेश चतुर्थी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंचायत क्षेत्रातील सर्व गावांमध्ये तातडीने गटार स्वच्छता करावी, बंद असलेले पथदीप सुरू करावेत, जल जीवन मिशनची (JJM) अर्धवट कामे पूर्ण करावीत, कचरा गाडीची नियमित व्यवस्था करावी तसेच व्हीबी ग्राम (VB Gram) रोजगार योजनेअंतर्गत स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी …

Read More »