Tuesday , October 6 2026
Breaking News

बोरगांव विविधोद्देशीय ग्रामीण कृषी कृषी संघातर्फे मृत सभासदांना दोन लाखाची मदत

Spread the love

 

 

निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील बोरगांव विविधोद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाचे कर्जदार मयत सभासद महेश चौगुले आणि बाळासाहेब आम्मण्णावर यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यांच्या वारसदार महेश यांच्या पत्नी सविता चौगुले व बाळासाहेब यांच्या मातोश्री विलासमती आम्मण्णावर प्रत्येकी एक लाख रुपये रकमेचा विमा धनादेश सुपूर्त करण्यात सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
सहकाररत्न उत्तम पाटील म्हणाले, संघाच्या माध्यमातून सभासदांच्या कुटुंबीयांना आधार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात येत असेल कुटुंबाला आर्थिक आणि मानसिक आधार दिला जात आहे. तरी सभासदांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास उपाध्यक्ष सुमित रोड्ड, प्रदीप माळी, राजू ऐदमाळे, प्रवीण पाटील, दर्शन पाटील, अशोक बंकापुरे, राजू गजरे, संचालक राजेंद्र पाटील, प्रदीप गजरे, सिईओ आर टी. चौगुले, राकेश फिरगनवर यांच्यासह संचालक आणि कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत अक्कोळची श्रावणी रांगोळे ठरली अव्वल

Spread the love  निपाणी (वार्ता) : श्री बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित अक्कोळ येथील श्री पार्श्वमती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *