बेळगाव : कॅपिटल वन या संस्थेची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री सत्यविनायक मंदिर, छत्रेवाडा अनुसरकर गल्ली येथे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव हंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेसाठी बहुसंख्येने सभासद उपस्थित होते. दि ३१ मार्च २०२६ अखेर संस्थेने सुमारे २३ कोटी ६४ लाख रुपयांच्या ठेवी २७.९२ कोटी रुपयांचे खेळते …
Read More »बोरगाव शेतकऱ्यांच्या मागणीची लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकाऱ्यांकडून दखल: शेतकऱ्यांनी मानले आभार
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथे घोसरवाड सीमा लागत असलेला जुना बंधारा दुरुस्ती करण्यासह शेतकऱ्यांसाठी नवीन बंधारासाठी प्रयत्न करावेत, या मागणीसाठी बोरगाव येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे ठरवले होते. याची दखल घेत लोकप्रतिनिधी व संबंधित पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. यासाठी शेतकरी बांधवांकडून आपण लोकप्रतिनिधी व पाटबंधारे …
Read More »शिक्षक भरतीत मराठी माध्यमाच्या १९५ जागांचा तातडीने समावेश करा : आमदार विठ्ठल हलगेकर यांची मागणी
खानापूर : कर्नाटकातील सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत रिक्त असलेल्या मराठी माध्यमाच्या १९५ शिक्षक पदांचा तातडीने समावेश करावा, अशी मागणी खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यासंदर्भात आमदार हलगेकर यांनी सरकारला पत्र पाठवून मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या डी.एड. आणि बी.एड. पात्रताधारक उमेदवारांवर …
Read More »केसरेकर कुटुंबीयांना आर्थिक मदत द्या; आमदार हलगेकरांची मुख्यमंत्री डी. के. शिवकुमारांकडे मागणी
खानापूर : सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसी परिसरात झालेल्या हल्ल्यात खानापूर तालुक्यातील हेब्बाळ येथील दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या दोन मुलांवर आई-वडिलांचे छत्र हरपले आहे. या अनाथ मुलांच्या भवितव्याचा विचार करून कर्नाटक सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खानापूरचे आमदार विठ्ठल सोमाण्णा हलगेकर यांनी मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्याकडे केली …
Read More »केसरेकर दांपत्याच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ बेळगावात मराठी भाषिकांचा एल्गार!
‘नराधमाला फाशी द्या, न्याय मिळालाच पाहिजे’च्या घोषणांनी दणाणले शहर; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बेळगाव : “फाशी द्या, फाशी द्या, नराधमाला फाशी द्या… न्याय हवा आहे, न्याय मिळालाच पाहिजे!” अशा संतप्त घोषणांनी शुक्रवारी बेळगाव शहर दणाणून गेले. सांगली-कुपवाड येथील केसरेकर दांपत्याच्या दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ समस्त मराठा समाज आणि मराठी भाषिक एकवटले. सरदार …
Read More »देसूरमध्ये गटारीचे पाणी मुख्य रस्त्यावर; ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण
देसूर : देसूर गावातील मुख्य रस्त्यावर गटारीचे घाण पाणी वाहत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्लास्टिक, कचरा आणि साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, महिला, लहान मुले तसेच पादचाऱ्यांना याच घाणीतून मार्ग काढावा लागत आहे. गेल्या वर्षभरापासून ही समस्या कायम असून, वारंवार ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणूनही अद्याप …
Read More »गर्लगुंजीतील माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; ४३ वर्षांनंतर एकत्र येत शाळांप्रती कृतज्ञता व्यक्त
गर्लगुंजी : गर्लगुंजी गावातील मराठी प्राथमिक शाळेच्या १९८१-८२ च्या इयत्ता सातवीच्या आणि ज्योतिराव फुले विद्यालयाच्या १९८३-८४ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एक आदर्शवत आणि स्तुत्य उपक्रम राबविला आहे. जानेवारी महिन्यात तब्बल ४३ वर्षांनंतर सर्व वर्गमित्रांनी एकत्र येऊन एका स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला आपल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील …
Read More »तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेला ६२ लाख ३७ हजार रुपयांचा निव्वळ नफा
मुदतठेवींचे नूतनीकरण करण्याचे चेअरमन प्रकाश मरगाळे यांचे आवाहन बेळगाव : श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ६२ लाख ३७ हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळविला असून सभासदांना यंदा १३ टक्के लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली आहे. बँकेच्या आर्थिक व्यवहारांना अधिक बळकटी देण्यासाठी मुदत पूर्ण झालेल्या ठेवीदारांनी आपल्या …
Read More »कर्नाटकातील बनावट औषधांचे देशभरात जाळे
अनेक राज्यांपर्यंत विस्ताराची शक्यता बंगळूर : तावरेकेरे येथील दोड्डेरी परिसरात उघडकीस आलेल्या बनावट औषधांच्या रॅकेटचे जाळे देशातील अनेक राज्यांपर्यंत विस्तारले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कर्नाटक औषध नियंत्रण विभागाने दिलेल्या माहितीनंतर देशातील सर्व राज्यांचे औषध नियंत्रक आणि राज्य परवाना प्राधिकरणांना सतर्क करण्यात आले आहे. बंगळुरच्या या रॅकेटचा मुंबई, तेलंगणा …
Read More »सांगलीतील हत्याकांडाच्या निषेधार्थ बेळगावात उद्या मराठा समाजाचा भव्य मोर्चा
बेळगाव : सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे मराठा समाजातील कष्टकरी दाम्पत्याची निर्घृण हत्या करून त्यांच्या दोन चिमुकल्या मुलांना अनाथ करणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ बेळगावात शुक्रवारी (२१ ऑगस्ट) मराठा समाज आणि मराठी भाषिकांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. खानापूर तालुक्यातील हेब्बाळ गावचे मूळ रहिवासी असलेल्या केसरेकर कुटुंबावर झालेल्या या हल्ल्यामुळे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta