Monday , October 5 2026
Breaking News

दसरा सुट्टी रद्द करणाऱ्या शिक्षण संस्थांवर कारवाईची श्रीराम सेनेची मागणी

Spread the love

 

बेळगाव : शासनाने जाहीर केलेल्या दसरा सुट्टीच्या कालावधीत शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांची सुट्टी रद्द करणाऱ्या शिक्षण संस्थांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी श्रीराम सेनेने केली आहे.

शासकीय नियमांचे उल्लंघन करून काही खासगी शिक्षण संस्था दसरा सुट्टीच्या काळात अतिरिक्त वर्ग घेत असल्याचा आरोप श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रविकुमार कोकितकर यांनी केला. यासंदर्भात त्यांनी सार्वजनिक शिक्षण खात्याच्या उपसंचालक (डीडीपीआय) लिलावती हिरेमठ यांना निवेदन सादर केले.

शासनाने ३ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत दसऱ्याची अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे. मात्र, काही संस्थांकडून सुमारे १० दिवस अतिरिक्त वर्ग भरवून विद्यार्थ्यांची सुट्टी रद्द केली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दसऱ्याच्या कालावधीत हिंदू धर्मातील विविध सण व परंपरा येत असल्याने विद्यार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार पूर्ण सुट्टी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून शाळा सुरू ठेवणाऱ्या संस्थांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी श्रीराम सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

महात्मा गांधी संस्थेतर्फे क्रीडा प्रशिक्षक व राज्य स्तरावर निवड झालेल्या खेळाडूंचा सन्मान

Spread the love  बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे राज्य व राष्ट्रीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *