


बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे राज्य व राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी यल्लापा बेळगावकर उपस्थित होते. गावातील विठ्ठल रखुमाई सभागृहात मोठ्या उत्साहात सन्मान सोहळा संपन्न झाला.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे उत्तम बाचीकर यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी हाॅकी कोच सुधाकर चाळके, सैनिक प्रशिक्षक बाळासाहेब पसारे यांचे खेळाडू घडविण्यासाठी मोठं योगदान आहे. त्याबद्दल शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
महिला कुस्तीपटू कल्याणी आंबोळकर हिची राज्य स्तरावर निवड. गावातील उदयोन्मुख पैलवान रवळनाथ कणबरकर यांने ८२,कि. गटात कोल्हापूर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. सध्या तो हरियाणा येथे कुस्तीचा सराव करतो आहे. गावातील धावपटू प्रेम बुरुड मद्रास रेजिमेंट सेंटरमध्ये प्रशिक्षण घेतो आहे. नुकताच राष्ट्रीय स्तरावरील अथलॅटिक्स स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त करून गावचे नाव उज्ज्वल केले. तसेच गोळा फेक स्पर्धेत वैभव गावडे बैलूर, खानापूर याची राज्य स्तरावर निवड झाली आहे. या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल महात्मा गांधी संस्थेतर्फे रोख रक्कम, सन्मानचिन्ह, गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले
यावेळी सुधाकर चाळके यांनी खेळाडूंचं मनोबल वाढवणे, आत्मविश्वास निर्माण करणे आवश्यक असते सातत्याने सराव केल्याने राज्य व राष्ट्रीय स्तरावर ग्रामीण भागातील विद्यार्थी चमकू शकतात हे मौलिक कार्य महात्मा गांधी संस्था करीत आहे हे अभिमानास्पद आहे असे मौलिक विचार व्यक्त केले.
सैनिक प्रशिक्षक बाळासाहेब पसारे यांनी खेळाडूंना मोफत मार्गदर्शन करु. जिद्द व चिकाटी मेहनत महत्त्वाची आहे असे विचार मांडले.
व्यासपीठावर संस्था अध्यक्ष वाय पी नाईक, यल्लापा बेळगावकर, के आर भास्कर, जोतिबा मोरे, चाळोबा सुतार, एम.पी मोरे, सौ.सरस्वती आंबोळकर, भुजंग कणकुंबकर, केदारी कणबरकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
आभार शिवाजी जाधव यांनी मानले.

Belgaum Varta Belgaum Varta