Monday , October 5 2026
Breaking News

बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्यावतीने ज्ञान व मनोरंजनाचा सुरेल मेळावा

Spread the love

 

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रातर्फे सोमवारपेठ, टिळकवाडी येथील डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर येथे ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास धुराजी होते. प्रमुख पाहुणे म्हणून घुमटमाळ मारुती देवस्थानचे उपाध्यक्ष गोपाळ बिर्जे उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष के. एल. मजूकर, कार्यवाह सुरेंद्र देसाई, सहकार्यवाह शिवराज पाटील, विजय वाईगडे व विठ्ठल पोळ उपस्थित होते.

गोपाळ बिर्जे यांनी ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. सकारात्मक विचार, आहारावर नियंत्रण, हलका व नियमित व्यायाम, प्रसन्न मन तसेच मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक भान जपण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांनी संस्थेला पाच हजार रुपयांची देणगी दिली.

अनंत सावंत यांनी प्रार्थना सादर केली. रविंद्रनाथ जुवळी, विजय वाईगडे, सतीश देशपांडे, स्वाती माने, मधू वाळवेकर, योगिनी देसाई, पी. एन. रायबागी, महेश अणवेकर, एम. एस. हुद्दार, भारती गावडे, अशोक कदम, प्रकाश कुडतरकर, अवधुत शेट्ये, अश्विनी पाटील व विजयमाला पाटील यांनी मराठी, हिंदी आणि कन्नड गीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

पितृपक्षानिमित्त भरत गावडे यांनी सादर केलेली ‘कावळा’ ही कविता उपस्थितांची विशेष दाद मिळवून गेली. यावेळी आजीव सभासद बाळासाहेब खासबाग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

सुरेंद्र देसाई यांनी स्वागत केले. शिवराज पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर विठ्ठल पोळ यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

दसरा सुट्टी रद्द करणाऱ्या शिक्षण संस्थांवर कारवाईची श्रीराम सेनेची मागणी

Spread the love  बेळगाव : शासनाने जाहीर केलेल्या दसरा सुट्टीच्या कालावधीत शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *