बिदर : बिदर जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता औराद (ब.) तालुक्यातील बोंठी येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला बिदर जिल्ह्यातील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष रामराव राठोड, सचिव पृथ्वीराज पाटील आणि सदस्य प्रा. …
Read More »१५ दिवस शवागृहात असलेल्या अनोळखी मृतदेहाला सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला अखेरचा निरोप
बेळगाव : गेल्या १५ दिवसांपासून सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागृहात ठेवण्यात आलेल्या अनोळखी मृतदेहावर सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले. मृत व्यक्तीची ओळख पटवून नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले; मात्र कोणीही पुढे न आल्याने बेळगाव सोशल वर्कर रेस्क्यू टीमने माणुसकीच्या भावनेतून अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली. या उपक्रमासाठी अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद …
Read More »राष्ट्रीय सब ज्युनिअर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या दिशा होंडीला एक सुवर्ण, दोन रौप्य पदके
बेळगाव : नुकत्याच जयपुर येथे झालेल्या 42 व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या दिशा होंडी हिने उत्कृष्ट कामगिरी करून एक सुवर्ण व दोन रौप्य पदकांची भरघोस कमाई केली. 4 x 100 मीटर फ्री स्टाईल रिलेमध्ये कर्नाटक राज्य संघात समाविष्ट असलेल्या दिशाने सुवर्णपदकाची कमाई केली तर 50 मीटर फ्रीस्टाइल …
Read More »ईद-ए-मिलाद उत्सव शांततेत साजरा करा; डीजेला पूर्णपणे बंदी
बेळगाव : ईद-ए-मिलादचा उत्सव शांततेत, शिस्तीत आणि बंधुभावाच्या वातावरणात साजरा करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. बैठकीस बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, पोलीस आयुक्त, विविध विभागांचे अधिकारी तसेच सीरत कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. मिरवणुकीत डीजेला …
Read More »कर्जाच्या विळख्यात विणकर कामगाराची जीवनयात्रा संपली; राहुल जारकीहोळींकडून कुटुंबाला धीर
बेळगाव : कर्जबाजारीपणाच्या आर्थिक विवंचनेतून मंगाईनगर, वडगाव येथील एका विणकर कामगाराने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विठ्ठल निंगाप्पा लोकरे (४२) असे मृत कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, लोकरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. १५ ऑगस्टच्या रात्री ११ वाजल्यापासून रविवारी सकाळी …
Read More »बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा एल्गार; बेळगावात पुतळा दहन, रास्ता रोको अन् जेलभरो
बेळगाव : मंत्री बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून बेळगाव भाजपने शनिवारी सरकारविरोधात जोरदार एल्गार पुकारला. भाजप महानगर व ग्रामीणच्या वतीने रास्ता रोको, जेलभरो आंदोलन तसेच बी. नागेंद्र यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. गेल्या सहा-सात दिवसांपासून …
Read More »म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात राखीच्या धाग्यातून स्वयंरोजगार अन् सृजनशीलतेचा सुंदर फुलला संगम
खानापूर : भावा-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे, विश्वासाचे आणि रक्षणाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण हा केवळ परंपरेचे जतन करणारा नसून आपुलकी, संस्कृती आणि सामाजिक सलोखा वाढवणारा सण आहे. या सणाचे औचित्य साधून, मराठा मंडळाच्या शिक्षण संस्थेच्या प्रेरणादायी अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॉलेजचे प्राचार्य अरविंद पाटील यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून …
Read More »ज्येष्ठ ग्रामीण मराठी साहित्यिक महादेव मोरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनी अभिवादन
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती ग्रंथालय व निपाणी येथील साहित्यिक रसिक मंडळातर्फे ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक महादेव मोरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महादेव मोरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. प्रा. शिवाजी मोरे यांनी, महादेव मोरे यांची …
Read More »नगरपालिका प्रशासनाचे पीओपीबाबत वराती मागून घोडे
७० टक्के मूर्ती तयार ; नगरपालिका अलर्ट मोडवर निपाणी (वार्ता) : गणेशोत्सव २१ दिवसावर आला असताना नगरपालिका यंदा प्लास्टर ऑफ पारस (पीओपी) मूर्तीच्या आयाती संदर्भात अलर्ट झाली आहे. पीओपी मूर्ती शहरात येणार नाहीत, याबाबत उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे शहरामध्ये दाखल होणाऱ्या मूर्तीची संख्या यंदा घटण्याची शक्यता आहे. शिवाय …
Read More »कर्नाटकात कृत्रिम पनीरवर एक वर्षासाठी बंदी; अन्न सुरक्षा विभागाचा आदेश
बेळगाव : सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने कर्नाटकात कृत्रिम पनीर अर्थात ‘अनालॉग पनीर’च्या वापरावर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. राज्य अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाने यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर खाद्यसंस्थांमध्ये कमी खर्चात पनीर तयार करून अधिक नफा मिळवण्यासाठी दुधाऐवजी वनस्पतीजन्य तेल, स्टार्च तसेच इतर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta