Monday , October 5 2026
Breaking News

आयएमएच्या बेळगाव शाखाध्यक्षपदी डॉ. सविता कद्दू, सचिव पदी डॉ. माधव प्रभू

Spread the love

 

बेळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या बेळगाव शाखेच्या नूतन अध्यक्षपदी डॉ. सविता कद्दू आणि सचिव पदी डॉ. माधव प्रभू यांची निवड करण्यात आली आहे. येत्या मंगळवार दि. 6 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता क्लब रोडवरील सिव्हिल हॉस्पिटल आवारातील आयएमए हॉलमध्ये होणाऱ्या पदग्रहण सोहळ्यात पदाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. माधुरी दीक्षित यांनी या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून तर अस्थिरोग तज्ज्ञ आणि आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. दिनेश काळे हे पदग्रहण अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

डॉ. सविता कद्दू गेल्या २६ वर्षांपासून बेळगाव येथे स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतीशास्त्रज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. त्यांनी बेळगावातून बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर सोलापूरच्या डॉ. व्ही. एम. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस आणि डीजीओ पूर्ण केले. वंध्यत्व निवारण (इन्फर्टिलिटी) हे त्यांचे विशेष आवडीचे क्षेत्र आहे. त्या सामाजिक सेवेसाठी सतत कटिबद्ध असून इनरव्हील क्लब आणि जितो यांसारख्या विविध संस्थांच्या माध्यमातून अनेक अर्थपूर्ण सामाजिक प्रकल्पांमध्ये सहभागी आहेत.

डॉ. माधव प्रभू हे या वर्षासाठी सचिव पदाची धुरा सांभाळतील. एक प्रतिष्ठित फिजिशियन असण्यासोबतच, डॉ. प्रभू हे येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये मेडिसिनचे प्राध्यापक म्हणूनही काम करतात. त्यांच्या नावावर अनेक वैज्ञानिक शोधनिबंध, व्याख्याने आणि शैक्षणिक पुरस्कार जमा आहेत.

About Belgaum Varta

Check Also

महात्मा गांधी संस्थेतर्फे क्रीडा प्रशिक्षक व राज्य स्तरावर निवड झालेल्या खेळाडूंचा सन्मान

Spread the love  बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे राज्य व राष्ट्रीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *