Sunday , October 4 2026
Breaking News

एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलमध्ये गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : टिळकवाडी येथील एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या शोभा कुलकर्णी, वरदा फडके, दीपा कामत, वनिता मोदगी, रश्मी पंडित, कस्तुरी बडीगेकर, सोनल भातकांडे आदी शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

यावेळी प्राचार्या शोभा कुलकर्णी, मनिषा नाडगोंडा, रश्मी पंडित तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांच्या विचारांचे महत्त्व, देशसेवेची भावना, सत्य, अहिंसा, प्रामाणिकपणा आणि साधेपणा या मूल्यांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या जीवनचरित्राचे वाचन करून त्यांच्या विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनात अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवी कुलकर्णी यांनी केले, तर स्वाती सरोदय यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रा. आर. एस. पाटील यांची ‘Achievers of Karnataka’ पुरस्कारासाठी निवड

Spread the love  खानापूर : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *