Sunday , October 4 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतनमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

Spread the love

 

बेळगाव : येथील मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये दिनांक 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेतील संगणक शिक्षिका पद्मजा कुऱ्याळकर व अटल लॅबच्या शिक्षिका स्नेहा कुप्पेकर उपस्थित होत्या. यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यानंतर
‘वैष्णव जन तो’हे भजन शिक्षकांनी संगीत विभागाचे शिक्षक सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांच्या साथीने म्हटले.
गांधीजींनी देशात ‘चले जाव’ (भारत छोडो), ‘असहकार आंदोलन’ आणि ‘दांडी यात्रा’ यासारखी मोठी आंदोलने उभारली आणि देशाला स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर आणून उभे केले. ते समाजसुधारकही होते. त्यांनी स्वच्छता, स्वावलंबन (खादीचा वापर) आणि अस्पृश्यता निवारण यावर आयुष्यभर भर दिला. स्वच्छता व शिक्षणाला महत्त्व त्यांनी दिले. अशा शब्दात प्रमुख पाहुण्या पद्मजा कुऱ्याळकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.तर
शास्त्रीजींचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी उत्तर प्रदेशातील मुगलसराय येथे झाला. त्यांचे जीवन अत्यंत साधे आणि विचार उच्च होते. ते अत्यंत प्रामाणिक, देशभक्त आणि खंबीर नेते होते. अशा शब्दांत स्नेहा कुप्पेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेतील वेगवेगळ्या भागातील स्वच्छता केली.
यावेळी शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील, शिक्षण संयोजिका नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार, बालवाडी विभाग प्रमुख सीमा कंग्राळकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीमध्ये बेळगाव जिल्हा राज्यात अव्वल

Spread the love  १७.७१ लाख लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण; १० ऑक्टोबरपर्यंत उर्वरित ४.७३ लाख जणांचे ई-केवायसी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *