Friday , October 2 2026
Breaking News

2.15 लाखांचे हेरॉईन जप्त; बेळगावात एकाला अटक

Spread the love

 

बेळगाव : शहरात बेकायदेशीररित्या हेरॉईन विक्री करणाऱ्या एका संशयिताला सीसीबी पोलिसांनी कारवाई करून अटक केली. त्याच्याकडून 10.77 ग्रॅम हेरॉईनसह मोबाईल असा एकूण ₹2 लाख 15 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव संदीप विजय अनगोळकर (वय 27) असे आहे. बेळगाव शहरातील बसवन गल्ली परिसरात सार्वजनिक ठिकाणी हेरॉईन विक्री सुरू असल्याची माहिती सीसीबी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.

या कारवाईत 10.77 ग्रॅम वजनाचे हेरॉईन तसेच ₹500 किमतीचा नोकिया मोबाईल जप्त करण्यात आला. याप्रकरणी बेळगाव शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या संशयिताला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

सीसीबीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कारवाईचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूरच्या के.पी.एस. मराठी मॉडेल शाळेत गांधी-शास्त्री जयंती उत्साहात

Spread the love  येळ्ळूर : येथील के.पी.एस. मराठी मॉडेल शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *