Friday , October 2 2026
Breaking News

दुष्काळग्रस्त तालुक्यांचा आकडा २१७ वर

Spread the love

 

बेळगाव जिल्ह्यातील कागवाड, गोकाक, सौंदत्ती आणि रामदुर्गचा समावेश; सरकारकडून चौथ्या टप्प्यात ४० तालुके घोषित

बेळगाव : यंदाच्या खरीप हंगामात पावसाची कमतरता भासत असलेल्या राज्यातील आणखी ४० तालुक्यांना राज्य सरकारने दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या आता २१७ वर पोहोचली आहे. नव्याने घोषित करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये बेळगाव जिल्ह्यातील गोकाक, रामदुर्ग, कागवाड आणि सौंदत्ती या चार तालुक्यांचा समावेश आहे.

राज्य सरकारने गुरुवारी (१ ऑक्टोबर) चौथ्या टप्प्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची अधिकृत घोषणा केली. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील चार तालुक्यांसह कारवार जिल्ह्यातील हळियाळ, शिरसी, अंकोला आणि भटकळ, तसेच धारवाड जिल्ह्यातील धारवाड, कलघटगी, कुंदगुळ आणि अळणावर या तालुक्यांचाही समावेश आहे.

राज्यातील दुष्काळग्रस्त तालुके घोषित करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात २७ ऑगस्ट रोजी १०१ तालुके, दुसऱ्या टप्प्यात १७ सप्टेंबर रोजी २३ तालुके, तिसऱ्या टप्प्यात २२ सप्टेंबर रोजी ५३ तालुके, तर चौथ्या टप्प्यात १ ऑक्टोबर रोजी आणखी ४० तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले.

पावसाचे प्रमाण, पिकांची स्थिती आणि उपलब्ध पाणीसाठा यांसह विविध निकषांच्या आधारे राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे सातत्याने मूल्यमापन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना दुष्काळाच्या संकटातून दिलासा देण्यासाठी टप्प्याटप्प्याने उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूरच्या के.पी.एस. मराठी मॉडेल शाळेत गांधी-शास्त्री जयंती उत्साहात

Spread the love  येळ्ळूर : येथील के.पी.एस. मराठी मॉडेल शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *