Sunday , July 26 2026
Breaking News

Belgaum Varta

20 वर्षांपासून बससेवेपासून वंचित गावांसाठी बस सुरू करण्याची मागणी; दलित संघर्ष समितीचे डेपो व्यवस्थापकांना निवेदन

  खानापूर : खानापूर तालुक्यातील मुडेवाडी, हत्तरगुंजी, डुक्करवाडी, सातनाळी, पिंपळी, मांजरपाई, माचाळी आणि घार्ली या गावांना गेल्या सुमारे 20 वर्षांपासून नियमित बससेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य दलित संघर्ष समिती (समन्वयक संघटना) यांच्या वतीने खानापूर येथील NWKSRTC बस डेपो व्यवस्थापक संतोष बेनकनकोप …

Read More »

कर्नाटक पब्लिक स्कूलमध्ये संगणक शिक्षणाला चालना; 2,500 आयटी शिक्षकांची भरती

  बेळगाव : डिजिटल युगातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन राज्य सरकारने शालेय स्तरावर संगणक शिक्षणाला प्राधान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना बालवयापासूनच माहिती तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळावे आणि भविष्यातील स्पर्धात्मक जगासाठी ते सक्षम व्हावेत, या उद्देशाने राज्यातील कर्नाटक पब्लिक स्कूलमध्ये (केपीएस) संगणक शिक्षणाची व्यापक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल …

Read More »

रेशनधारकांना मोठा दिलासा! जूनपासून एकदाच बायोमेट्रिक, धान्य वितरण होणार सुलभ

    बेळगाव : मागील महिन्यात रेशन मिळवण्यासाठी दोनदा बायोमेट्रिक करण्याच्या सक्तीमुळे रेशनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला होता. सर्व्हर डाऊन, बोटांचे ठसे न उमटणे आणि वारंवार रेशन दुकानांच्या फेऱ्या यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता जून महिन्यात रेशनधारकांना मोठा दिलासा मिळाला असून, एकदाच बायोमेट्रिक पडताळणी करून धान्य …

Read More »

बस सेवा सुरळीत न केल्यास आंदोलनाचा इशारा

  खानापूर : शाळा व महाविद्यालयांना नुकतीच सुरुवात झाली आहे मात्र खानापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अपुऱ्या बसवेमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे बस सेवा सुरळीत करावी यासाठी परिवहन मंडळाला निवेदन देण्यात आले असून बस सेवा तातडीने सुरळीत न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांतर्फे …

Read More »

सराफ कॉलनीतील विहिरींमध्ये ड्रेनेजचे पाणी झिरपले; नागरिकांमध्ये संताप

  बेळगाव : अजंटा हॉटेलच्या पाठीमागील सराफ कॉलनी परिसरात ड्रेनेजच्या गळतीमुळे सहा उघड्या विहिरी आणि एका बोअरवेलमधील पाणी दूषित झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील काही ड्रेनेज मॅनहोलमधून सांडपाण्याची गळती होत असल्याने …

Read More »

मोदगे येथे सर्पमित्राने दिले सापाचा जीवदान

  दड्डी : मोदगे येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये साप आढळल्याने काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सर्पमित्र धनंजय पाटील यांच्या तत्परतेमुळे सापाला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडून जंगल परिसरात सोडण्यात आले. मोदगे येथील आन्नाप्पा पाटील यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये काम सुरू असताना अचानक साप दिसून आला. साप पाहताच …

Read More »

श्रीमंताऐवजी सर्वसामान्यांना घरकुले द्या; बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे

  शासकीय विश्रामधामात बैठक निपाणी (वार्ता) : प्रधानमंत्री आवास योजनेतून पट्टणकुडी हद्दीत दाईंगडे मळा येथे बांधण्यात आलेल्या जी प्लस-२ घरांचे वाटप गरजू सर्वसामान्य लाभार्थ्यांना व्हावे, यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे यादी सदोष करावी अशी मागणी केली होती. दि. २० मे रोजी विद्यमान आमदार व माजी खासदारांनी लाभार्थ्यांची यादी सदोष न बनविता …

Read More »

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात निपाणीत कारवाई

  पोलिसांकडून ‌बुलेटसह तलवारी जप्त निपाणी (वार्ता) : शहरात कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने, निपाणी पोलिसांनी बुधवारी (ता.१०) सकाळी विशेष मोहीम राबवून विविध भागांमध्ये राहणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींच्या घरांवर छापे मारण्यात आलंय. या कारवाई दरम्यान तलवार आणि एक नोंदणी नसलेली बुलेट बाईक जप्त करण्यात आली असून संबंधित व्यक्तींवर …

Read More »

नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

  बेळगाव : लग्नाच्या आनंदाला अवघा महिना उलटत असतानाच एका नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना बेळगाव शहरात घडली आहे. महाद्वार रोड परिसरातील अष्टेकर गल्ली येथे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रक्षिता पुजारी (वय २९) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा विवाह मंजुनाथ कृष्णा पुजारी याच्यासोबत …

Read More »

महागाईची झळ सलून व्यवसायालाही; दाढी-केस कर्तनाच्या दरात २० टक्क्यांची वाढ

  बेळगाव : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या वाढत्या महागाईची झळ आता सलून व्यवसायालाही बसली आहे. वाढलेल्या खर्चाचा ताळमेळ घालणे कठीण झाल्याने शहापूर सलून असोसिएशनने दाढी, केस कर्तन आणि इतर सलून सेवांच्या दरात २० टक्क्यांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे नागरिकांना सलून सेवांसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. …

Read More »